आदिवासींची जन्म मृत्यूची नोंद होतच नाही;बिरसा फायटर्सच्या २ वर्षाच्या पाठपुराव्याने जिल्हाधिकारी यांची बिलीचापडाला भेट!
चित्रा न्युज प्रतिनिधी
तळोदा:दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी बिलीचापडा येथील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत नंदूरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डाॅ.मित्ताली सेठी यांनी
भेट दिली.बिलिचापडा येथील आदिवासी बांधवांच्या मुलभूत समस्यांवर बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गेल्या २ वर्षापासून सुरू ठेवलेला पाठपुरावा व दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या आदिवासी संघटनांच्या सभेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी बिलीचापडा येथील प्रलंबित मागण्या रोखठोक मांडल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी बिलीचापडा येथे भेट दिली.
या भेटीत जिल्हाधिकारी मित्ताली सेठी सोबत तळोदा तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा,वनविभागाचे अधिकारी,बांधकाम विभागाचे अधिकारी,ग्रामसेवक, आशा वर्कर इत्यादी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.त्याचबरोबर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले व संपूर्ण बिलीचापडा बिरसा फायटर्स टिम व गांवकरी माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांचा पुष्प गुच्छ देऊन आदिवासी भगिनींनी स्वागत केले.तहसीलदार यांचे स्वागत गाव अध्यक्ष वनसिंग पटले यांनी केले तर गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा यांनी केले.त्यानंतर जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी भारतीय बैठकीनूसार स्वतःच जमीनीवर बसत सर्वांना जमीनीवर बसवत आदिवासी बांधवांशी हितगुज साधत समस्या जाणून घेतल्या.व संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जन्म मृत्यू व विवाहाची नोंद करा.१३ वर्षाच्या मुलाची जन्म नोंद नाही,गेल्या अनेक वर्षांपासून होत नसलेल्या जन्म मृत्यूची नव्याने नोंद करा.जन्म मृत्यू नोंद न केल्याची तक्रार पुन्हा आल्यास ग्रामसेवक व सरपंच ला अपात्र करण्याची सक्त सूचना दिल्या.बिलीचापडा येथील मंजूर वनदाव्यांचे वनपट्टे प्रमाणपत्र द्या.बिलीचापडा येथे ५० बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा.बिलीचापडा येथे शाळा सुरू करा.विजेची सोय करा. पाण्याची सोय करा. रहिवाशी दाखला व घरपट्टी द्या.रस्ता डांबरीकरण व खडीकरण करा.इत्यादी मागण्या गांवक-यांकडून करण्यात आल्या.
जिल्ह्य़ात शिवजयंतीची सुट्टी शासकीय असतांना जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी वेळ काढून बिलीचापडा येथे भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे गांवक-यांनी आभार मानले.बिरसा फायटर्सच्या २ वर्षाच्या पाठपुराव्याने आज स्वतःच जिल्हाधिकारी आपल्या दारी बिलीचापडा येथेच आल्यावर गांवकरी खुश झाले व आदिवासी संघटनेचे आभार मानले.
0 टिप्पण्या