चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:- शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत त्यांनी सर्वसामान्य जनतेला रुग्णसेवा मिळावी म्हणून स्वतः रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे मित्रपरिवार बहुउद्देशीय संस्था निर्माण केली आणि या संस्थेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रक्त तर पूरर्वीलेच मात्र त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडली तर मग तो पैसा असो की राहण्याची व्यवस्था कपड्यांची व्यवस्था कोणाचा मरण झालं तर लोक वर्गणीतून त्यांच्या अंतिम संस्काराची व्यवस्था हे सर्व रुग्ण सेवक सुरेश भाऊ तायडे यांनी अहोरात्र जनसेवा करत असतात स्वतः त्यांनी आतापर्यंत रक्तदान केले आज पंजाबराव हॉस्पिटल अमरावती येथे दादाराव इंगळे दर्यापूर तालुक्यातील अत्यंत सिरीयस व्हेंटिलेटर वर आहेत त्यांच्या मुलाचा कॉल आला की मला ब्लड ची गरज आहे आरोग्य सेवक सुरेश भाऊ तायडे यांनी तात्काळ पंजाबराव ला जाऊन आपले रक्तदान केले
कोरोना मध्ये रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी हजारो नागरिकांना भोजनदान दिले जी मुलं आपल्या आई-वडिलांचे प्रेत सोडून लोक पडत होते त्यांचे अंतिम संस्कार सुद्धा सुरेश भाऊ तायडे यांनी केले अशा निस्वार्थी समाजसेवकांनी सिद्ध केले की जनसेवा हीच ईश्वर सेवा
सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दामोधरे यांनी रुग्ण सेवक सुरेश भाऊ तायडे याचें अभिनंदन केले
0 टिप्पण्या