चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- शहरातील उळेगाव ब्रिजजवळ एक अज्ञात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. विशेष म्हणजे, या महिलेबरोबर एक लहान बाळ देखील आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिच्या उजव्या हातावर 'अभिषेक' असे गोंदलेले आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीने महिलेची वैद्यकीय तपासणी करून सोलापूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांकडून तिच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. मात्र, तिची ओळख पटलेली नसल्याने नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या महिलेची ओळख पटवून तिला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष महंमद पठाण यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
📞 महिलेबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
➡ महंमद पठाण – 9325164242
➡ जवळील पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती द्यावी.
महिलेबरोबर लहान बाळ असल्यामुळे तिच्या परिस्थितीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ती कोण आहे? ती येथे कशी आली? तिच्यासोबत काही अनुचित प्रकार तर घडला नाही ना? या सगळ्या बाबींची चौकशी पोलीस करत आहेत.
सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन या महिलेच्या ओळखीचा शोध घ्यावा आणि तिला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या