Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्याचे निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका व रस्त्यांची प्रलंबित कामे तात्काळ करा,मागणीसाठी आदिवासी संघटनांचे २१ फेब्रुवारीला शहादा येथे ठिय्या आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना आक्रमक

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :  रस्त्याचे निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका व प्रलंबित रस्ते तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा,या मागणीसाठी आदिवासी संघटनांचे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनाचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,अरूण पावरा ,दिलीप महिरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                            सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा धडगांव तालुक्यातील कालापाणी ते हेंगलापाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा.रस्ता नसल्याने १० दिवसापूर्वी एका नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.ग्रामस्थांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते.गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी व रूग्णांना उपचारासाठी बाम्बुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते.सौ.हेमलता शितोळे-पाटील ठेकेदार यांना रस्त्यांचे निष्कृष्ट काम केल्याबद्दल व ठेका घेऊन अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल काळ्या यादीत टाका.प्रलंबित कामे चांगल्या ठेकेदारांकडून करून घ्या.पुढील एकही रस्त्याचा ठेका देऊ नका.रस्त्यांचे निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका व  ठेका घेऊन रस्त्यांचे काम प्रलंबित ठेवणा-या ठेकेदाराचे काम अन्य चांगल्या ठेकेदाराला देऊन काम तात्काळ पूर्ण करा.धडगांव तालुक्यातील जरली फाटा ते बाहगाया रस्त्याचे निष्कृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा. दराफाटा ते दरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करा.एक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे ठिगारे पडून असलेले शहादा तालुक्यातील तवळाई ते आंबापूर व म्हसावद ते सुलतानापूर रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा. शहादा तालुक्यातील  कोळपांढरी ते टाकली,शहाणा ते दोंडवाडा, शहाणा ते मतराला, शहाणा ते लंगडी,मंदाणे ते जावदा, मंदाणा ते गोटाळी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा.शहादा तालुक्यातील कुसुमवाडा ते फत्तेपूर ३ किलोमीटर रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार कारवाई करा.रस्त्याचे  निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांचे बील मंजूर करू नका. रस्त्याच्या कामांत अनाधिकृतपणे  टक्केवारी घेणा-या अधिकारी,कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई करा.चांगले व टिकाऊ रस्ते होण्यासाठी टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा.या मागण्यांसाठी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या