Ticker

6/recent/ticker-posts

मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर महिला मंडळ अणदूर आयोजित मातोश्री रमाई जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी.

मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र


धाराशिव: - अणदूर तालुका तुळजापूर येथे मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने उत्साहात मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
दिनांक ७फेब्रुवारी शुक्रवारी दिवसभर विविध उपक्रमाने उत्साहात मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील घेऊन मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी राजकुमार गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बोर्डाचे पुजन करण्यात आले, अणदूर भिमनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थी बुद्ध विहार येथे महिला मंडळाच्या वतीने धम्म वंदना घेतली.
.
 सालेगांव तालुका लोहारा येथील भीम ज्योत गायन पार्टी यांचा दिवसभर गायन पार्टीचा कार्यक्रम घेण्यात आला
संध्याकाळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा व जाहीर सभेचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका निंबोळे यांनी केले प्रास्ताविक राजकुमार गायकवाड यांनी केले, आभार बाबई चव्हाण यांनी मांडले,
 जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार राजस्वामी राजेश देवसिंगकर ,साहेबराव घुगे कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्मिता कांबळे, यांचा सत्कार लक्ष्मी सुर्यवंशी,तर प्रमुख पाहुणे अर्चनाताई पाटील यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी राजकुमार गायकवाड यांनी केले. यावेळी उमेद बचत गटाच्या सर्व महिला व CRP शिला जेटीथोर, शैलजा पाटील, रेणुका निंबोळे,वैजयंता बोंगरगे व त्यांच्या महिला मंडळ,  रमाई आंबेडकर महीला मंडळाच्या उपाध्यक्ष रेश्मा कांबळे श्रीमती इंदुबाई सूर्यवंशी, लक्ष्मी सूर्यवंशी, मायाबाई कांबळे ,भाग्यश्री चंदनशिवे, विशाखा गायकवाड, सीमा मुकरे ,सुनीता गवळी, रंजना मुकरे, शिवाबाई भालशंकर, जोशना गायकवाड, चंदा कांबळे ,चंद्रकला भालेराव, ललिता दुपारगुडे ,शोभा गायकवाड ,सविता मस्के ,जयश्री नागनाथ कांबळे ,सुज्ञान सुरवसे, मुक्ताबाई बनसोडे, निर्मला सूर्यवंशी, छाया कांबळे ,रमाबाई ढवळे ,कांताबाई बब्रुवान कांबळे, यांच्यासह बंजारा समाजातील महिला,वडार समाजातील महिला, आणि महिला मंडळातील सदस्य व पदाधिकारी यांचे सह सिध्दार्थ तरुण मंडळ दयावान ग्रुप बुद्ध दर्शन तरुण मंडळ रमाई ग्रुप, युवा, विद्यार्थी, पुरुष, बहुसंख्येने महीला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या