Ticker

6/recent/ticker-posts

दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान

चित्रा न्युज प्रतिनिधी

गोंदिया :-थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची 24 डिसेंबर रोजी शतकोत्तर रोप्यमहोत्सव जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त
 
परेल मुंबई येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती ( महाराष्ट्र राज्य),च्या वतीने विशेष उल्लेखनिय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती बाबतचा विचारांची उजळणी करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

 त्यामध्येच युवा नेतृत्व म्हणून दैनिक युवक आधारचे संपादक, कर्तुत्वान, अभ्यासू, जनसंपर्क व्यक्तिमत्व  संतोष शिवदास आमले यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे *मा.कुलगुरु तथा माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आता पर्यंत संतोष आमले यांना दादासाहेब फाळके 2025 अवॉर्ड  तसेच ललकारी सन्मानाची राज्यस्तरीय पुरस्कार, पनवेल येथे भीम रत्न पुरस्कार,असे अनेक पुरस्कार त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे संतोष आमले चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


आज गुरुजींचे विचार समयोजित आहेत खऱ्या भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी सक्रिय होणे हीच गुरुजींना त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आदरांजली ठरेल असे संतोष आमले यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले


 

10 पेक्षा जास्त वर्षाचा उद्योगांचा अनुभव असलेल्या दैनिक युवक आधार चे संपादक संतोष आमले यांनी आपल्या वृत्तपत्र व उद्योगाच्या माध्यमातून मार्गदर्शन म्हणून एक उत्तम पिढी घडवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. 
नेतृत्व आणि नवकल्पनांचा प्रवास खूप सहनशीलता मागतो आणि संतोष आमले यांनी आपल्या व्यवसाय आणि वृत्तपत्राचे कौशल्याने व्यवस्थापन केले ते सांगतात की त्यांचे कुटुंब हा त्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे जो नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असतो.




नैतिकता आणि प्रामाणिकता हे संतोष आमले संपादक दैनिक युवक आधार यांच्या यशाचे आधारस्तंभ आहेत.
संतोष आमले यांना आपल्या यशाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले चांगल्या परिणामांसाठी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा परिणामावर नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या