Ticker

6/recent/ticker-posts

दलित समाजातील मुलींनो आयोध्यातला हरी+राम हा हाराम आहे,तो तुमचे रक्षण करू शकत नाही विजय बनसोडे !


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र 

धाराशिव: - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण बहुमताचा सरकार योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वात आहे. मुस्लिम समाजाला अध्यक्षतेमध्ये ठेवणे,हिंदू धर्माचा डंका वाजविणे, मागासवर्गीय आणि आदिवासी महिला/मुलींची बलात्कार करणे,त्यांचे खूण कारणे,मागासवर्गी्यांच्या वस्त्या जाळणे,घरादरा वर बुलडोझर फिरवीने,अशी अनेक मागासवर्गीय आणि बहुजन विरोधी कृत्य करण्यासाठी आणि आरोपीना पाठीशी घालण्यासाठी "सत्तेचा" दुरुपयोग करत आहे.

अयोध्‍यातील दलित तरुणीची क्रूर हत्या,डोळे फोडले,हाडे मोडली निर्वस्त्र केले.उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात 22 वर्षीय दलित तरुणीची तथाकथित सैतानाला लाजवेल अशा अमानुष पद्धतीने हत्या केल्याचा आरोप असलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.आरोपींची ओळख हरी राम कोरी,विजय साहू आणि दिग्विजय सिंह अशी आहे.एस.एस.पी राज करण नैय्यर यांनी सांगितले की,नशेत असताना आरोपींनी गावातील एका शाळेत युवतीची हत्या केली.याठिकाणी विशेष बाब अशी की,ती पीडिता गावातील मंदिरातून कथा ऐकूण घराकडे जात होती.खरं तर तीला पुसटशी ही कल्पना नव्हती की,रस्त्यात तीला "हरी+राम" दारूच्या नशेत आडवा येणार आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न होऊन निर्घृण पद्धतीने ठार मारणार आहे.रात्रीच्या वेळी पीडिता घराकडे जात असताना शाळेच्या बाजूला दारू पीत बसलेल्या हरी रामने तीला पाहिले आनं तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला,बलात्काराचे प्रयत्नला विरोध होताच तीला अतिशय क्रूर पद्धतीने ठार मारण्यात आले आणि नंतर तिचे शव नाल्याजवळ फेकले.पोलिस आता तिघांना रिमांडवर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

मागसवर्गीय तरुणीची क्रूर हत्या,मृतदेहाची स्थिती मानवतेला काळिमा फासणारी !

या प्रकरणातील भीषणता उघड करताना पोलिसांनी सांगितले की,युवतीचे शव निर्वस्त्र अवस्थेत सापडले होते.तिचे हात-पाय बांधलेले होते,डोळे फोडले गेले होते आणि शरीरावर अनेक जखमा होत्या.कुटुंबियांनी आरोप केला आहे की,तरुणीला सामूहिक दुष्कर्मानंतर तिला मारले गेले.तिच्या शवाची ओळख तिच्या जावयाने केली,गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्या नाल्यात पिडीत तरुणीची "शव" (मृतदेह)  सापडून आले.तीन दिवसांपासून गुंजत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते.

या अमानवीय अपराधामुळे आणखी एका मागासवर्गीय मुलीचे आयुष्य संपले.खरं तर उत्तर प्रदेशांमध्ये राम-राज्यामध्ये उत्तर प्रदेशाच्या रामराज्यामध्ये मागासवर्गीय आणि आदिवासी समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आणखी किती दिवस असंच न्यायासाठी रडावं लागेल ?

बहुजन विरोधी भाजपच्या राजवटीत विशेषतः उत्तर प्रदेशात मागासवर्गीयावरील घृणास्पद अत्याचार,अन्याय आणि हत्याची प्रकरणे बेलगाम वाढत आहेत.उत्तरप्रदेश सरकारने या गुन्ह्याची तातडीनं चौकशी करत दोषींच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी.आणि कृपया नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबाला त्रास देऊ नका.देशातील मुली आणि संपूर्ण दलित समाज तुमच्याकडे न्यायासाठी पाहतो आहे.

कुटुंबाची पीडा आणि समाजाची प्रतिक्रिया
पिडीत तरुणीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.की,तिच्या शरीरावरच्या जखमा आणि डोळे फोडल्याची स्थिती पाहून त्यांना अत्यंत धक्का बसला आहे.गावातील लोकांनीही या अमानुष घटनेवर नाराजी व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात अतिरिक्त पथक तैनात केले आहे.ह्या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सोशल मीडियावर पिडीत तरुणीला न्याय देण्याची मागणी करणाऱ्यांची आवाजांना ताकद मिळाली आहे.तसेच उत्तर प्रदेशच्या विविध सामाजिक राजकीय संघटनांनी सुद्धा हे प्रकरण हे प्रकरण हाताशी घेऊन मुलीला न्याय देण्यासाठी जोर धरला आहे.

 चौकशी सुरू,आरोपींना कठोर शिक्षेची मागणी पोलिस आता आरोपींच्या मागच्या इतिहासाची तपासणी करत आहेत.

त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,ज्यात हत्या, सामूहिक अत्याचार आणि पुरावे नष्ट करणे समाविष्ट आहे.

 पीडित कुटुंब आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणात कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

 पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, चौकशी पारदर्शक पद्धतीने केली जाईल आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जाईल.
  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पार्टीचे सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालायच्या सत्तेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैर वापर करत राज्यातील मागासवर्गीय,आदिवासी आणि मुस्लिम समाजावर मोठ्या अन्याय अत्याचार करत आहे.(स्रोत : गुगल)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या