चित्रा न्युज प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर :- पैठण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मावसगव्हाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जयंतीचे औचित्य साधून पंधराव्या वित्त आयोग योजनेमधून १० टक्के महिला व बालकल्याण सदराखाली आशा स्वयंसेविकांना ॲ नड्रॉइड मोबाईलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रुक्मणबाई विठ्ठल शिंदे, उपसरपंच छाया काकासाहेब कानुले, ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण तान्हाबाई भाऊसाहेब गव्हाणे, ग्रा. पं. सदस्य प्रकाश मच्छिंद्र जाधव, रुक्मिणीबाई सोपान गवांदे, सुभद्राबाई कुंडलिक तेजीनकर, चंद्रकला माणिक साळवे, सरला लक्ष्मण सुराशे, विठ्ठल भिवसन पवार, सुलभा संदीप शिंदे, यांच्यासह ज्ञानेश्वर तेजीनकर, माऊली जाधव तंटामुक्त अध्यक्ष, रामेश्वर जाधव, विकास साळवे, सतीश साळवे, गोवर्धन जाधव, संजय जाधव, दिलीप जगताप, ग्रामपंचायत कर्मचारी विजय केदारे, हसन शेख, उमाकांत जाधव, शिवाजी तेजीनकर, महेश शिरवत, सचिन तेजणीकर, आशा स्वयंसेविका सूर्यकला बोबडे, लंका गुंजाळ, गीता लहंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आशा स्वयंसेविकांना मोबाईलचे वितरण करताना ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे, तंटामुक्ती अध्यक्ष माऊली जाधव व इतर मान्यवर.
0 टिप्पण्या