चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-मानवासह गुरं,पशु,पक्षी यांच्यासाठी कलयुगातील संजीवनी गुटी मिळेल असे ठिकाण म्हणजे कायदेशीर पदवी घेऊन गावखेड्यांसह शहरांत चालणारे मेडीकल स्टोर्स आहेत. माञ,उदगीर तालुक्याती हंडरगुळी व हाळी या गावात असलेले मेडीकल स्टोर्स म्हणजे *"आओ जाओ घर तुम्हारा"* अशा प्रकारचे बनले आहे. याचे कारण म्हणजे मेडीकल स्टोर्स चालविण्यासाठी आवश्यक असलेले मान्यताप्राप्त डीग्री नसलेले लोकचं कांही मेडीकल चालविताना सामान्य जनतेला दिसतात.परंतू संबंधित ड्रग ईन्सपेक्टरला हे दिसत नाहीत.याचे कारण काय?का,एखाद्या व्यक्तीचा किंवा गुरांचा प्राण गेल्यावरचं ड्रग ईन्सपेक्टरचे डोळे उघडणार आणि त्याला दिसणार का?
किरकोळ व होलसेल दुकाणासाठी अलग-अलग ड्रिगी असते.तसेच यात जनरल स्टोर्सही चालवायचे असेल तर म्हणजे औषधी शिवाय इतर वस्तूं ठेवायच्या असतील तर यासाठी पण वेगळा परवाना लागतो.आणी हे सर्व प्रमाणपञ/डिग्री दर्शनी भागात स्पष्ट दिसेल असे लावायचे असते.परंतू, हाळी-हंडरगुळी येथे असलेल्यांपैकी कांही मेडीकल दुकाणात जनरल स्टोर्ससह फार्मासिस्टचा परवाना नसलेले व औषधांची कसलीही बारा खडी माहित नसलेली व्यक्तीच कांही मेडीकल स्टोर्स मध्ये बिनधास्तपणे बसत आणि औषधी देत असल्याचे सामान्य जनतेला दिसत आहे.
Chemist & Druggist हे फक्त दिखाव्यासाठी तसेच जनतेसह सर्व संबंधित अधिका-याला - बनवायला लिहीलेले दिसते.प्रत्यक्षात माञ कांही दुकाणात डिग्री प्राप्त नसतोच! दुसराच कुणी बसुन धंदा करताना दिसतो.म्हणुन येथील मेडीकल स्टोर्स हे "कुणी ही यावे अन् टिकली मारुन जावे" तसेच "आओ जाओ घर तुम्हारा" अशा बनले असुन,वेळ न दवडता ड्रग ईन्सपेक्टरने तपासणी व कारवाई करणे गरजेचे आहे.कारण आजवर अशा दुकाणावर कारवाई केल्याचे कुणालाही आठवत नाही. म्हणुन आता तरी ड्रग ईन्सपेक्टर हा विषय मनावर घेतील का?व कारवाई करतील का?याकडे लक्ष आहे.
0 टिप्पण्या