दि.सहा रोजी वाढवणा येथे येणार आय.जी.शहाजी उमाप साहेब.....
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-नांदेड-बिदर राज्यमार्गाच्या दुतर्फा बेकायदेशीरपणे केलेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांवर कांही वर्षापुर्वी सा.बां विभागातर्फे हातोडा फिरवण्यात आला होता.तसेच तत्कालीन आयपीएस.पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी ही संबंधितांना अतिक्रमण काढुण घेण्यास भाग पाडले होते.म्हणुन हा रोड रुंद व मोकळा दिसत होता.पण हटविल्यानंतर एक-दोन दिवसातच पुन्हा त्या जागेत,त्याच लोकांनी पुर्वी पेक्षाही मोठ्याप्रमाणात बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. त्यांच्याकडील टेबल,खुर्च्या,बाकडे यासारख्या वस्तू राज्यमार्गालगतच ठेवत असल्यामुळे तसेच बेशिस्तीत थांबणा-या बाईक्स व हातगाडे यांच्यामुळे या रोडवर सदा ट्रॅफीक जॅम होत असते.आणि या सर्व प्रकरणाची सत्यस्थिती न्युज पेपरातुन मांडुन ही याकडे कोणताच विभाग लक्ष देत नाही.म्हणुन येथील अतिक्रमण हटाव मोहिमेची अधूरी राहिलेली कहाणी अतिक्रमण हटवुन पुर्ण करणार का? व आयपीएस.निकेतन कदम यांच्यासारखे धाडस आयजी तथा आयपीएस असलेले श्री.शहाजी उमाप साहेब दाखविणार का?. कारण,इन्सपेक्शनसाठी दि.सहा रोजी "बायरोड" याच मार्गे वाढवणा ठाण्याला आय.जी.शहाजी उमाप जाणार असल्याने जनतेचे लक्ष याकडे लागले आहे.
देशाच्या विविध राज्यात गुरांच्या बाजारामुळे हंडरगुळी या गावाचे नाव प्रसिध्द आहे.आणि याच गावा मधुन गेलेल्या राज्यमार्गालगत कांही व्यक्तींनी सा.बां.विभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करुन विविध प्रकारचे विनापरवाना धंदे {दुकाणे} थाटल्याचे दिसत आहे.व याच मार्गालगत असलेल्या जि.प.कें. प्राथमिक शाळेच्या मेन गेट समोर व कंपाऊॅंड भिंतीस लागुनच अनेकांनी विनापरवाना माॅंस,मटन विक्रीचे अड्डे
/ धंदे थाटुन फुलांच्या माळा / हारं लटकवतात तसे माॅंस,मटन लटकवत असतात. ते पण अतिक्रमीत जागेत. हे विशेष..! आणि याबद्दल आवाज उठवुन व फोनवरुन माहिती देऊन सुध्दा हे सगळे अतिक्रमण प्रशासन काढीत नाही.यामुळे संबंधित अधिका-याची भुमिका शंकास्पद वाटते.म्हणुन दि. सहा रोजी याच मार्गे "बाय रोड" इन्सपेक्शनसाठी वाढवणा पोलीस ठाण्याकडे जाणा-या शहाजी उमाप आय.जी.साहेब यांनी तरी याची दखल घ्यावी,अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
राजकिय व प्रशासकीय आधार
सा.बां.खात्याने बांधलेल्या नालीवर व सा.बां.खात्याच्याच जागेवर मोठ मोठे अतिक्रमण झाल्याचे जनतेला दिसत आहे.माञ संबंधित खात्याचे अधिकारी महोदयांना दिसत नाही? का,ते जाणुन-बुजून आंधळ्याचे सोंग तर घेत नाहीत ना?याचे उत्तर जनतेला अपेक्षीत आहे.एकंदरीत पाहता येथील अतिक्रमनाकडे राजकिय व प्रशासकीय पातळीवरुन अर्थपुर्ण ! कानाडोळा होत असल्या - मुळेच येथे अतिक्रमण वाढल्याचे या गावातील जनतेत बोलले जात आहे. कारण,शाळेलगत माॅंस विक्री करु नये यासाठी लोकप्रतिनिधींनी आणी अतिक्रमण होऊ नये,यासाठी सा.बां. खात्याच्या अधिका-यानी विशेष असे लक्ष दिले नाही.म्हणुनच येथे मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झालेले व विनापरवाना धंदे थाटलेले दिसते.
अवैध माॅस विक्रेत्यांना आधार देतोय कोण?
हा खरा प्रश्न हाळी व परिसरातील जनतेला सतावतोय. कारण,कोणताही धंदा करायचा म्हटल की,संबंधित विभागाचा लेखी परवाना पाहीजे.व तो दर्शनी भागात लावला पाहीजे.परंतू,जि.प.शाळेच्या कंपाउॅंड भिंतीस लागुन व सा.बां. खात्याच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करुन थाटलेल्या धंदे — वाल्यांकडे संबंधित विभागाचा 1 ही परवाना नसल्याचे दिसते.तरी पण हे धंदे अतिक्रमित जागेवर कुणाच्या आधारावर चालतात?ते पण वर्षानु- वर्षापासुन! तेंव्हा या बेकायदा धंदे व अतिक्रमणांवर आय.जी.शहाजी उमाप साहेब चालविनार का "रोड - रोलर" याकडे जनतेचे लक्ष आहे..
अभियंता सा.बां.खाते उदगीर यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या