विजय चौडेकर जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड -रमाई, घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, अंतर्गत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आले ज्यांनी पक्के घर बांधलेले आहेत, त्यांना घरकुल मंजूर झाले, काही लोकांना डबल घरकुल मंजूर झाले एका घरात तीन ते चार जणांना घरकुल मिळाले बरेच लोकांनी घरकुल चे बांधकाम केलेच नाही, त्यांनाही पैसे मिळाले, आणि जे खरे लाभार्थी आहेत अत्यंत गरीब परिस्थितीत जगणारे त्यांना वंचित ठेवण्यात आले आणि जे खरे लाभार्थी साध्या पत्र्याच्या घरात पडक्या घरात राहतात जे दिव्यांग, विधवा, वृद्ध, आहेत त्यांना हे ग्राम पंचायत चे सरपंच व ग्रामसेवक, सांगतात पहिला हप्ता फक्त 15000 रु, चा त्या पंधरा हजार रुपयांमध्ये खालच बेसमेट पुर्ण झालेल फोटो पाठवा तरचं दुसरा हप्त्याचे पैसे मिळतील गरीब पंधरा हजार रुपयांमध्ये खालच बेसमेटच बांधकाम करू शकत नाही कारण एक वाळू ची गाडी घ्यायची तर पंधरा हजार रु जातात बाकीचे कुठून आणणार हा गरिबाचा प्रश्न आहे, आणि हे सरपंच, व ग्रामसेवक,हे फक्त अशा लोकांची चौकशी करतात याने घर बांधायला सुरुवात केली का नाही बेसमेट पुर्ण झालेल आहे का, आणि जे पहिलेच पक्के घर बांधलेले आहेत,जे त्यांच्या अगदी जवळच्या संबधातले आहे त
किंवा लेन देणं केलेले आहेत त्यांची चौकशी न करता पंचायत समिती ला अहवाल पाठविला जातो आणि त्या धनदांडगे लोकांना पैसे मंजूर होऊन त्यांच्या खात्यात जमा होतात याची चौकशी व्हायला हवी का नाही,हे असं तर पहिल्या पासून होतंच आहे,हि काही नवीन बाब नाही, परंतु या मध्ये पक्के घर बांधून राहतो त्यांचा फायदा सरकारी नौकरी वाले आहेत त्यांना घरकुल मंजूर झाले, आणि जे खरे लाभार्थी आहेत ते वंचित च राहाणार, जिल्हाधिकारी साहेबांनी व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी,मिनल करनवाल मॅडम यांनी ज्यांना नौकरी, पक्की घरे ,बांधलेले आहेत, किंवा ज्यांनी घरकुल बांधलेच नाही, त्यांना पैसे कसे मिळाले त्या लाभार्थींची, ग्राम पंचायत,व पंचायत समिती ने चौकशी का केली नाही,का केली नाही याची दक्षता घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व त्यांच्या वर योग्य कारवाई करावी अशी मागणी जनते कडून होतं आहे
0 टिप्पण्या