चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील हाळीहंडरगुळी या 2 गावातुन गेलेल्या नांदेड-बिदर या राज्यमार्गाचे रुंदिकरणाचे आणि सिमेंटीकरणाचे काम वर्षभरापुर्वी केले आहे.माञ,याच रोडवर एकाही ठिकाणी स्पीडब्रेकर बसविले नाहीत म्हणुन हा रोड धोकादायक बनला आहे.तेंव्हा या रोडवर किमान पाच ठिकाणी अपघात विरोधी यंञणा - स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी हाळी-हंडरगुळीकरांमधुन होत आहे. आंन्ध्रप्रदेश,कर्नाटक व तेलंगणा या 3 राज्यांना जोडणारा हा मार्ग आहे. यामुळे व गुरांचा प्रसिध्द असलेला बाजार हंडरगुळीत भरत असल्याने या रोडवर रोज हजारो वाहनांची ये- जा असते.तसेच याच रोड शेजारी शाळा,महाविद्यालय,बॅंका,बाजार पेठ,हाॅटेल्स,पोलीस दुरक्षेञ,तलाठी, ग्रा.पं.कार्यालय,सी.एस.सी सेंन्टर्स ई आहेत.यामुळे परिसरातील हजारो वाहनांसह लाखों जनतेची या रोडवर ये-जा असते.त्यात भर म्हणुन की काय मिसुरडं ही न फुटलेले पोरं दोन चाकी गाडी ट्रीपल सीट्स सुसाटपणे चालवतात.आणि अशा ना-बालक असलेल्या चालकांमुळे येथे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. तेंव्हा या रोडवर पाच ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे.
वडगाव रोडवर स्पीडब्रेकर आहे.
राज्य मार्गावर का नाही?
येथून वडगाव एक्की (ता.चाकुर) कडे जाणा-या आडमार्गावर वाहनांची गर्दी कमी असते.तरीही या रोडवर अनेक ठिकाणी स्पीडब्रेकर आहेत.
माञ,राज्यमार्गावर एकही का,नाही?
स्पीडब्रेकर नसलेला एकमेव राज्यमार्ग जि.प.च्या असलेल्या रोडवर स्पीडब्रेकर अनेक ठिकाणी आहेत.माञ तीन राज्यांना जोडणारा म्हत्वाचा तसेच वर्दळीचा राज्यमार्ग असलेला येथील नांदेड-बिदर मार्गावर एकही स्पीडब्रेकर नाही.यामुळे स्पीडब्रेकर नसलेला लातुर जिल्ह्यातील एकमेव राज्यमार्ग म्हणुन या मार्गाची नोंद करावी लागेल..!
अपघात झाल्यावरच डोळे उघडतील का ?
उदगीर शहरानंतर तालुक्यात मोठे गाव व बाजारपेठ असलेल्या ठिकाणच्या राज्य मार्गावर वाढती लोकांची व वाहनांची गर्दी तसेच लहान मुलं धुमस्टाईल चालवित असलेली वाहने पाहता येथे कधी पण अपघात होऊ शकतो.आणि अपघात झाल्यावरचं सा.बां.खात्याचे डोळे उघडतील का? तसेच संबंधित विभागातर्फे या रोडवर अपघात विरोधी यंञणा उभी करतील का? असे सवाल जनतेतुन विचारला जातोय..
0 टिप्पण्या