Ticker

6/recent/ticker-posts

त्याग मूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती संपन्न, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन जाहीर सत्कार,


चित्रा न्युज प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील भोजापुर येथे बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपूर, त्रिरत्न बुद्ध विहार पंच कमिटी व महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा रामटेक, यांच्या संयुक्त विद्यमाने, त्यागमूर्ती माता रमाई यांची 127 वी जयंती दिनांक:-07/02/2025 रोज शुक्रवारला स्थळ- भोजापुर तालुका रामटेक जिल्हा नागपूर येते बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपूर, बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे अध्यक्ष :- बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपूर रवींद्र बोरकर, प्रमुख वक्ते - निळाई संपादक व आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक प्रवीण कांबळे, प्रमुख उपस्थिती- भदंत नाग दीपंकर महाथेरो केंद्रीय सल्लागार, भीम संग्राम सेना अध्यक्ष भागवत सहारे, प्राध्यापक कठाणे सर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल अंबादे, साक्षोधन कडबे भारतीय बौद्ध महासभा रामटेक, सविता नारनवरे, सुधाकर पाटील, समीर मोटघरे, प्रकाश लांजेवार, रामदास तागडे, मिलिंद पाटील, भीमराव पाटील, दिलीप तभाने, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, सुनील नितनवरे, भामा सोमकुवर, युवराज अडकणे, भारत अडकणे, उपसरपंच, शाहीर अरुण मेश्राम, रमेश रामटेके, रवींद्र मेश्राम, मुरलीधर सवाई थु ल, ज्ञानेश्वर पाटील, गुलाबराव चंदनखेडे, भीमराव लोखंडे, विजय उ के, पुंडलिक मेश्राम, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार सुप्रसिद्ध गायक भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून त्याग मूर्ती माता रमाई यांचे विज्ञानवादी विचार :- चंदनापरी झिजली - रमाई भिमाच्या घरी, घडविला विद्यापती - त्याग मूर्ती होती खरी, पहाटे उठूनी रमाई - रोज वरळीला जाई, दिवसभर शे नी थापूनी,- पाणी पिऊनी राही, असह्य गरीब वेदना - दाबून ती ठेवी उरी, चंदनापरी झिजली - रमाई भिमाच्या घरी, समाज प्रबोधन गीत सादर केले, त्यांना पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी गायिका भामा सोमकुवर, गायिका कल्पना गजभिये, गायिका सविता नानावरे, गायिका नीलकमल गोंडाने, गायक युवराज अडकणे, शाहीर अरुण मेश्राम, शाहीर रमेश रामटेके, शाहीर रवींद्र मेश्राम, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गायक विजय ऊ के, गायक सुनील नितनवरे, गायक रवींद्र बोरकर, गायिका साधना बोरकर, गायक दुतीयोधन कडबे, प्रतिमा गजभिये, नवरत्न आरोडे, शालू गजभिये, सुरेखा अडकणे, बालक बागडे, राजकुमार अडकणे, भारत, ऊ के, ईश्वर डोंगरे, राकेश डोंगरे, ज्योती कडबे, अश्वजीत सहारे, गंगाधर पाटील, विनोद कोठरे, गायक संजय मेश्राम, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर मोडघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवराज अडकणे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या