Ticker

6/recent/ticker-posts

मधुकरराव दर्वेकर बहुदे्शीय शिक्षण संस्था चंद्रपूर द्वारा संचालित संकल्प कॉन्व्हर्ट भोयगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

चित्रा न्युज प्रतिनिधी

 भद्रावती /चंद्रपूर : स्वर्गीय मधुकरराव दर्वेकर  बहुद्देशीय संस्था चंद्रपूर  द्वारा संचालित संकल्प कॉन्व्हेंट भोयगाव  येथे सांस्कृतिक कार्यक्रम दि. 04/02/2025 रोज मंगळवारला  संस्थाध्यक्ष  श्री अनंता दरवेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

  या कार्यक्रमा प्रसंगी ब्रिजभुषन पाझारे यांनी उपस्थित विध्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना  "आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तिने शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजे" एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या सेवेसाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातुन समाज आणि गावाच्या विकासासाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे  या प्रसंगी सांगितले. 

       यावेळी प्रामुख्याने  उपस्थिती ब्रिजभुषण पाझारे, संस्थापक दर्वेकर सर, भोयगाव येथील  सरपंच शालिनीताई बोन्डे , मुख्याध्यापक कस़तुरे सर, संस्थेच्या सचिव सौ़. वर्षाताई दर्वेकर,होत्या.

या कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली कला सादर करुन यशस्वीरीत्या पार पाडला.
 
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शालिनी बोंडे, मुख्यध्यापक कस्तुरे सर, मासिरकर सर, सुप्रिया मॅडम, तुराणकर मॅडम, पिंपळशन्डे मॅडम, भावना मॅडम,  संस्थेच्या सचिव वर्षाताई दर्वेकर, भोयगाव येथील सरपंच यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाकरीता पालक वर्ग तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मासिक सर तर प्रास्ताविक कस्तुरे सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या