Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा ग्रामपंचायत येथे प्लास्टील निर्मुलन व महास्वच्छता अभियान.


चित्रा न्युज प्रतिनिधी

भद्रावती : तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायत व वनविभाग ताडोबाच्या संयुक्त रित्या मौजा आष्टा येथील आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ला प्लास्टिक निर्मूलन व महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

या अभियाना करीता मा. श्री. विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर,मा.श्री.रेड्डी साहेब उपवनसरक्षक चंद्रपूर, मा. श्री. अनिकेत भांडारकर साहेब तहसीलदार भद्रावती, मा. श्री. आशुतोष सपकाळ साहेब गटविकास अधिकारी पं. स. भद्रावती, प्रामुख्याने उपस्थित होते.
 
या अभियानात श्री.चिवंडे साहेब वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा, सौ. प्रणाली भागवत मॅडम विस्तार अधिकारी पं. स. भद्रावती, श्री. कामटकर साहेब वनपाल आष्टा, श्री नन्नावरे साहेब वनपाल भानुसखिंडी, श्री. भरत राठोड ग्रामपंचायत अधिकारी आष्टा, श्री. हेमंत मेहेर साहेब ग्रामपंचायत अधिकारी, श्री थुल साहेब SBM पं. स. भद्रावती सौ. पुरामशेट्टीवर मॅडम SBM पं. स. भद्रावती,, श्री. दडमल साहेब मंडळ अधिकारी मुधोली,, सौ. टिपले मॅडम तलाठी आष्टा,, श्री. चांगदेव रोडे सरपंच ग्रामपंचायत आष्टा, सौ. सुरेखा अहिरकर उपसरपंच ग्रामपंचायत आष्टा, श्री. नंदकिशोर आत्राम सदस्य ग्रामपंचायत आष्टा, श्री. सुहास बहिरे पोलीस पाटील आष्टा, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी,, आष्टा गावातील नागरिक,, शाळेतील विध्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यशस्वी रित्या पार पाडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या