चित्रा न्युज प्रतिनिधी
जालना :-भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगांव येथील सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक लहुजी शक्तीचे पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री प्रभाकर उत्तमराव गोफणे यांची मातंग अस्मिता संघर्ष सेना या संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजाभाई सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार व मराठवाडा अध्यक्ष नितिन दादा तलवारे यांनी नियुक्ती केली आहे या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या