भंडारा :-गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालयात आय डी ए हत्तीरोग दुरीकरण मोहीम
गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय ,तुमसर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सुभाष चंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकरिता ठरलेल्या तारखेनुसार दिनांक 18 जानेवारीला आयडीए हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत विद्यार्थिनींच्या उंचीनुसार त्यांना डी इ सी, अल्बेंडेजल,आईवरमेकटीन ची एक मात्र खाऊ घालण्यात आली. सदर मोहिमेला विद्यार्थिनींनी समुचित प्रतिसाद दिले. या वेळेस सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्णालय, तुमसर वरून नियमित आरोग्य क्षेत्र कर्मचारी श्री के एस टनमने व परिचारिका कु. माहेश्वरी रामकृष्ण मारबते, कु. पूजा राष्ट्रपाल गजभिये उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांनी या दिवशी अनुपस्थित होत्या त्यांच्या करिता दिनांक 20 जानेवारीला पुन्हा मोहीम घेण्यात आली. व त्याला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिले. शासनाच्या या मोहिमेच्या यशस्वीते करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज सेलोकर, महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. मुबारक कुरेशी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या