चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-जागतिक ग्राहक दिन हा दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. ग्राहक दिनाची संकल्पना अमेरिकेचे तात्कालिक राष्ट्रअध्यक्ष जॉन. एफ .केनेडी यांनी सर्वप्रथम मांडली .त्यांनी अमेरिकन संसदेमध्ये त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी ग्राहक हक्कांबद्दल परखडपणे भाषण केले. त्यात त्यांनी ग्राहकांच्या महत्वाच्या हक्काबाबत उल्लेख केला. असे भाषण करणारे ते पहिलेच जागतिक नेते होते .यावरूनच पुढे consumers इंटरनॅशनल ह्या संघटनेने १५ मार्च १९८३ पासून जागतिक पातळीवर साजरा करायचा निर्णय घेतला.
१९८५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ग्राहकांच्या हक्क संरक्षणा साठी काही मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केला.आणि तेव्हापासून ग्राहक हक्कांना जागतिक मान्यता मिळाली. आणि विविध देशांनी ग्राहक हक्क संरक्षण कायदे लागू केले..
ग्राहकांचे प्रमुख हक्क सुरक्षिततेचा हक्क ....उत्पादने किंवा सेवा ही दर्जेदार आणि १) सुरक्षितच असावी हा ग्राहकांचा पहिला हक्क आहे.
२)माहितीचा मिळवण्याचा हक्क....उत्पादने किंवा सेवा खरेदी करताना तिच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा अधिकार
३)निवडीचा हक्क...वस्तू गुणवत्तापूर्ण किंवा दर्जेदार निवडण्याचा अधिकार
४) क्षातिपूर्तीचा हक्क ...
एखाद्या उत्पादनापासून किंवा सेवा पासून क्षती किंवा हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार
५) ग्राहक शिक्षणाचा हक्क...ग्राहकांनी त्यांच्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचा हक्क.
६)पर्यावरण शिक्षणाचा हक्क..
स्वछ व निरोगी वातावरणात राहण्याचा हक्क.
जगभरात ग्राहकहक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्वाचा असतो.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण आणि ग्राहकांच्या हक्काचा आदर करणे हा असतो.
१५मार्च 1986 पासून ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यावर चिंतन, मनन करून त्यांना योग्य दिशा
देऊन सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
ग्राहक दिन साजरा करण्याचे काही मार्ग आहेत.
ग्राहकहक्कबद्दल कार्यशाळा चर्चासत्र आयोजित करणे.
सामाजिक माध्यम वापरून ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबद्दल लोकांना माहिती मिळवण्यास मदत करणे.
ग्राहक हितसंबंध जपणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकारवर दबाव टाकणे.
जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण यावर प्रकाश टाकणारा दिवस आहे. ग्राहकांनी त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आवश्यक आहे.सरकारी संस्था आणि समाज यांनी एकत्र येऊन ग्राहक हित जोपासणे काळाची गरज आहे.
दरवर्षी consumers इंटरनॅशनल च्या वतीने एक नवीन थीम दिली जाते .ज्यामुळे जगभर एकाच विषयावर चर्चा, चिंतन , अंमलबजावणी होते.
जागतिक ग्राहक हक्क दिनाची 2025 ची थीम ही न्याय संक्रमण ते शाश्वत जीवनशैली अशी आहे. ही थीम निरोगी जीवनशैली सर्व ग्राहकांसाठी सुलभ, सर्वत्र उपलब्ध सुलभ आणि परवडणाऱ्या गरजांवर प्रकाश टाकते.ज्यामुळे लोकांच्या
मूलभूत गरजा आणि हक्कांचे पालन होईल.
शाश्वत जीवनशैलीची गरज ह्या साठी आहे वाढत्या पर्यावरणीय समस्येमुळे शाश्वत जीवनशैली स्वीकारणे अपरिहार्य झाले आहे
यामध्ये ऊर्जाबचत ,ऊर्जेचा पुनर्वापर,आणि पर्यावरणपूरक उत्पादने वापरणे ह्यांचा समावेश होतो.
न्याय संक्रमण म्हणजे सर्व घटकांना शाश्वत जीवनशैली कडे वळण्याची संधी मिळावी,यासाठी न्याय संक्रमण आवश्यक आहे.यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अडचणीचा विचार करून उपाययोजना केल्या जातात.
ह्यासर्व प्रक्रियेत ग्राहकांची भूमिका महत्वाची ठरतेय.
ग्राहकांनी त्यांच्या खरेदी निर्णयात पर्यावरण पूरक गोष्टींचा विचार करावा
पुनर्वापर योग्य , ऊर्जाकार्यक्षम आणि कमी प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे.
आणि स्वतंरोबरोबर इतरांनाही शाश्वत जीवनशैली विषयी मार्गदर्शन करावे.
तरच खऱ्या अर्थाने जागतिक ग्राहक दिन साजरा होईल
ग्राहकाने संघटित होनेही आजच्या परिस्थितीत तितकेच गरजेचे आहे.


0 टिप्पण्या