चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-ईदगीर तालुक्यातील हाळी—हंडरगुळी व परिसरातील भाविकांचा विशेषत: ५० वयस्कर भाविकांचा 1 चमू काशी, मथुरा, आयोध्पा,प्रयागराज, उज्जैन,हरेश्वर, ओमकारेश्वर यासह राज्यातील परळी, औंढा,शेगाव आदी ठिकाणच्या देवस्थानांचे दर्शन घेऊन नुकताच गावी सुखरुप परतल्यामुळे भक्तांसह संयोजक अजय पटवारी यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. हंडरगुळी व परिसरातील गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटूंबियातील भाविक- भक्तांना इच्छा असुनही दुरदुरच्या मंदीरांना व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे व तेथील देवी-देवतांचे दर्शन घेणे शक्य होत नाही. माञ,हंडरगुळी येथील वै.मलिकार्जुन शंकरअप्पा पटवारी यांनी "ना नफा,ना तोटा" या तत्वावर राज्यासह परराज्यांतील मंदीरांना व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन तेथील देवी-देवतांचे दर्शन घेता यावे, यासाठी संगमेश्वर ट्रॅव्हल्स माध्यमातुन गरीबांसाठी याञा सहल सुरु केली.आणि त्यांच्या पश्चात मुलगा अजय याने हि परंपरा कायम ठेवली व परवाच येथील 50 जेष्ठ नागरीकांची एक टीम वरील ठिकानी जाऊन सुखरुपपणे गावी परत आली. *माता-पित्याची सेवा करावी, तशी सेवा या प्रवासा दरम्यान संयोजक अजय पटवारी यांनी सलग 15 दिवस केली आहे. अशी माहिती दिगांबर दत्तनूरे, देवानंद धुप्पे यांनी दिली.
तसेच मे मध्ये ही विविध धामाच्या दर्शना करीता ट्रॅव्हल्स जाणार असून,यासाठी A/C सुविधा व स्लिपर कोच असलेली बस बांधली आहे.व " जन सेवा हिच ईश्वर सेवा" असे समजुन स्व.पटवारी मलिकार्जूनअप्पा यांनी "ना नफा,ना तोटा" या तत्वावर सुरु केलेली ही परंपरा कायम ठेवली आहे. व लवकरच चार धाम,आठ धाम याञासाठी आम्ही गोरगरीब, मध्यमवर्गीयांना लवकरच घेऊन जाणार आहोत. तरी याचा जास्तीत - जास्त भाविकांनी लाभ घ्यावा,अशी विनंती,आवाहन अजय पटवारी,ओम बोळेगावे, बस्वराज धुप्पे,सोमनाथ मेनमवार,बालू उडतेवार यांनी केली आहे.
0 टिप्पण्या