चित्रा न्युज प्रतिनिधी
गोरेगांव :- दिनांक ०६ मार्च २०२५ रोज गुरुवारला विभागीय कृषी सहसंचालक नागपूर श्री उमेश घाडगे यांनी घोटी येथील शेतकरी उत्पादक "पोंगेझरा फार्मर प्रोडूसर कंपनी” येथे भेट देऊन साठवन गोडाऊन व मशीन सेट तसेच कंपनीची पाहणी केली.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक श्री.उमेशजी घाडगे यांनी शेतकरी बांधवांना सांगितले की,खरिप मध्ये धानपिक निघाल्यानंतर सरसो,जवस,तिळ या तिन्ही पिकांचे उत्पादन होऊ शकते.
आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबद् माहिती दिली व आधुनिक तंत्रज्ञानाने सरसो,जवस,तिळ या पिकाची लागवड तसेच मार्केटिंग ग्रेडिंग व पॅकिंग तसेच कृषी विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक प्रगतीशिल शेतकरी माजी उपसभापती गोरेगांव सुरेंद्र(बबलु)बिसेन यांनी विभागीय कृषी सहसंचालक श्री.उमेशजी घाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानोले, प्रकल्प आत्मा संचालक अजित आडसुळे, तालुका कृषी अधिकारी सुलोचना पातोळे मॅडम ,उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया महेंद्र ठोकरे, अर्थ सल्लागार सचिन कुंभारे,पुरवठा मंडळ मूल्य साखळी तज्ञ सुनील कडाले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गजानन पटले,कृषी पर्यवेक्षक देवेंद्र पारधी, मंडळ कृषी अधिकारी चंद्रशेखर कुरंजेकर यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी कार्यक्रमास उमेंद्र ठाकुर, रवी चचाने,सतीश चन्ने,सुरेंद्र टेंभरे,डिलेश राऊत इत्यादी सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावना पोंगेझरा फार्मर्स प्रोडूसर कंपनीचे संचालक सुरेंद्र(बबलु)बिसेन यांनी व
संचालन उमेंद्र ठाकुर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन सुरेंद्र टेंभरे यांनी केले.
0 टिप्पण्या