Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा याचा भव्य मोर्चा !

 महामहीम राष्ट्रपतींना देण्यात आले निवेदन


चित्रा न्युज प्रतिनिधी
बाळापूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, तिच्या सर्व विंग्स, भारतीय बौद्ध महासभा आणि भिकू संघ यांच्या वतीने बाळापुर येथे एक भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व विविध पदाधिकाऱ्यांनी केले आणि महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, भास्कर भोजने, आम्रपाली ताई खंडारे, अनुराधाताई डांगे, जाहीदाबी ताई, राहुल इंगळे, सुगत डोंगरे, सिद्धार्थ वानखडे, संजय उमाळे, मंगेश गवई, लोध ताई, सोनटक्के ताई, रूपाली ताई गवई, बावनेताई, शेगोकार ताई, एल.के. डोंगरे, अफसर खान, गजानन उगले, कवडकर ताई, देवानंद अंभोरे, पी.टी. तायडे, यशोधरा ताई इंगळे, योगेश इंगळे, सुहास इंगळे, सहदेव भटकर, प्रदीप शिरसाट, संजय पाटील, दादाराव वानखडे, सुभाष तायडे, राजू मोरे, तानाजी मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनात भिकू संघ, महिला उपासक संघ, वंचित बहुजन आघाडीचे विविध घटक व भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततापूर्ण मार्गाने काढलेल्या या मोर्चात महाबोधी महाविहाराच्या स्वातंत्र्याची आणि बौद्ध जनतेच्या हक्कांची जोरदार मागणी करण्यात आली.

या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तत्काळ महाबोधी विहार बौद्ध भिकू संघाकडे हस्तांतरित करावे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे असावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, आणि त्यासाठी आता देशभरात जनआंदोलनाचे स्वरूप घेतले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या