चित्रा न्युज प्रतिनिधी
बागपत :-उत्तर प्रदेशात एक जमाना आर पी आय चा होता.चौधरी चरण सिंह यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे 19 आमदार उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून आले होते.आता मात्र बहुजन समाज पक्षाचा जमाना आहे.पण एक दिवस निश्चित पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा जमाना उत्तर प्रदेशात येईल असा मला विश्वास आहे. आर पी आय चे संस्थापक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्यामुळे आगामी काळात उत्तर प्रदेशात आणि संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाचा जमाना येईल.असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.ना.रामदास आठवले आज उत्तर प्रदेशातील बागपत मधील गौरी पूर येथील ओशियन वाटर वर्ल्ड पार्क येथे रिपब्लिकन पक्षाचे नेते सचिन सिंह यांच्या वतीने आयोजित होली मिलन समारोहात प्रमुख अतिथी म्हणून सहभाग घेतला.त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर आयोजक रिपब्लिकन कार्यकर्ते उद्योजक सचिन सिंह; सोनू कुंडली माजी मंत्री साहिब सिंह ; रमेश कुशवाहा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी है देश के लोगोंके वाली
इस लिये मना रहे है हम होली ..!
अगर एक साथ आएंगे दलित राजपूत और जाट;
लगा देंगे हम सब की वाट ..!
यहा आग गयी है होली मिलन की लाट..:
आपस मे एक दुसरे को प्यार बाट ..!!
अशी कविता न.रामदास आठवले यांनी सादर करताच सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.
0 टिप्पण्या