Ticker

6/recent/ticker-posts

बोधगया मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी
जालना - बुद्धगया मंदीर कायदा १९४९ रद्द करून महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देणेबाबत पोलिस निरीक्षक सेवली, ता.जि.जालना यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती, भारत सरकार, नवी दिल्ली व बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

बुद्धगया मंदीर १९४९ चा कायदा रद्द करावा व महाबोधी विहार बोधगयाचा ताबा बौद्धांना सुपुर्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा सचिव गणेश खरात भगवान माघाडे, लहुजी पोहरे, भास्कर गाडेकर , प्रल्हाद पालवे, सर्जेराव सदावर्ते, अरुण काकडे, अंबादास पट्टेकर, दगडुबा पट्टेकर, प्रसाद सदावर्ते  यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या