चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी चेतन चंद्रकांत अहिरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रक्रियेवर आणि निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे.
ही सुनावणी आज (२६ मार्च) होणार होती. मात्र, न्यायालयाला प्रकरण प्रभावीपणे हाताळण्यासाठी वेळ न मिळाल्याने ती पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी न्यायालयाने ही याचिका स्वीकारत भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती.
या खटल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर चेतन अहिरे यांचे वकील म्हणून न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.


0 टिप्पण्या