चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-सध्या रमजान महिण्याला प्रारंभ झाला असून अनेक महिला,पुरुष अख्खा महिना रोजा धरतात.माञ,हाळी ता.उदगीर येथील माजी उपसरपंच शरीफभाई टप्पेवाले (शेख) यांचा सात वर्षीय चिमुकला नातू आणि खलील टप्पेवाले {शेख} याचा मुलगा चि.आवेज याने पविञ अशा रमजान महिण्यातील रोजा धरला असून,पहाटे पाच ते राञी सात वाजेपर्यंत म्हणजे जवळपास १५ तास हा चिमुकला कडक उपवास करीत असल्याने त्याच्या या धाडसाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. तसेच आवेजला अनेकजण शुभेच्छा देतात.
0 टिप्पण्या