Ticker

6/recent/ticker-posts

जोहार हेअर सलूनचे लोणखेडा येथे शानदार उद्घाटन!

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे जोहार हेअर सलूनचे शानदार उद्घाटन विद्याश्रम ॲकाडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दिनेश पावरा यांच्या शुभ हस्ते रिबिन कापून करण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी श्रीफळ फोडून दुकानाचा शुभारंभ केला.सामाजिक कार्यकर्ता तथा नागझिरीचे उपसरपंच सचिन पावरा यांनी आदिवासी कुलदैवता याहा मोगी माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर दुकानदाराने पिता उदेसिंग पावरा यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. जोहार हेअर सलूनचे चालक हर्ष पावरा यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी विद्याश्रम ॲकाडमीचे असंख्य विद्यार्थी व  लोणखेडा परिसरातील अनेक तरूण मंडळी उपस्थित होते.प्राध्यापक दिनेश पावरा यांनी व्यवसायिक क्षेत्रात प्रगती कशी करावी?याबाबत तरूणांना अनेक टिप्स दिले.
        आमच्या  आदिवासी समाजाचे सुशिक्षित तरूण हे व्यवसायिक क्षेत्रात उतरत आहेत, याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.समाजात अनेक सुशिक्षित तरूण नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगार आहेत. सरकार सरकारी नोक-या बंद करून नोक-यांचे  कंत्राटीकरण म्हणजेच खाजगीकरण केलेले आहे.त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या भरोशावर राहू नये.आपल्या कडील असलेल्या कला कौशल्याच्या आधारे व्यवसाय करावा.जमेल ते काम करावे.कोणतेही काम करतांना लाजू नये.कोणतेही काम हे लहान किंवा मोठे नसते.जो काम करतांना लाजला तो आताच्या युगात जगू शकणार नाही,त्याला भूख राहावं लागेल. म्हणून तरुणांनी व्यवसायाकडे वळावे. जोहार हेअर सलूनचे मालक हर्ष पावरा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.शहादा व लोणखेडा परिसरातील सर्व ग्राहकांनी जोहार हेअर सलूनच्या सेवेचा लाभ घ्यावा,असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या