Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षिका ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी
तुमसर: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून त्यांना ₹30,000 रोख बक्षीस मिळाले.

तुमसर येथील जिजामाता विद्यालयात  कार्यरत असलेल्या नागलवाडे यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नवे उपक्रम राबवले. त्यांनी पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षणात सुधारणा घडवली. विशेषतः छोटे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन क्षमतेत वाढ करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आणि शाळेच्या प्रगतीला चालना मिळाली.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
#bhandara #maharashtra #CMOMaharashtra #infovidarbha #mahadgipr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या