Ticker

6/recent/ticker-posts

त्या’ खून प्रकरणातील आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी


लाखणी तालुक्यातील मोगरा येथील खून प्रकरण

चित्रा न्युज प्रतिनिधी

भंडारा :-अनैतिक संबंधातून गावातीलच तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची घटना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोगरा/शिवणी येथे शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी ३ वाजता सुमारास घडली होती. पुष्पा रामेश्र्वर बनकर वय (३८ वर्षे,रा.मोगरा/शिवणी,ता. लाखनी) असे मृतक महिलेचे नाव असून,खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७वर्षे, रा.मोगरा,त. लाखनी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या घटनेतील मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी असून, मागील तीन वर्षापासून दोघात अनैतिक प्रेमसंबधं होते. दरम्यान,शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपीने मृतक महिलेला शेतशिवारात बोलावले होते. तिथे दोघात वाद झाला. या वादातून आरोपीने रस्सीने गळा आवळून महिलेचा निर्घृणपने खून केला. घटनेनंतर आरोपीने लाखनी पोलिस ठाणे गाठले व खूनाची कबुली दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हान, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव व लाखनी पोलिस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाली होती.

याप्रकरणी जनार्धन जानबा बनकर (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २२ ते २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या