चित्रा न्युज प्रतिनिधी
मंगरूळ दस्तगीर:-मंगरूळ दस्तगीर निंबोली परिसरात असलेल्या बरमपुर निंबोली नाल्याच्या खोलीकरणासाठी परिसरातील शेतकरी यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप दादा अडसड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
गेल्या अनेक वर्षापासून जळगाव निंबोली मंगरूळ येथील शेतकऱ्यांच्या शेताला लागून हा नाला आहे. पावसाळ्यामध्ये या नाल्याला पूर आल्यावर या परिसरातील दीडशे ते दोनशे एकर जमीन ही पडीक पडल्या जाते. या परिसरात शेतामध्ये संपूर्ण पाणीच पाणी राहते. या नाल्याची खोलीकरण व रुंदीकरण केल्यास परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे मत उमेश भुजाडणे यांनी आमदार प्रताप अडसड यांच्यासमोर व्यक्त केले.
आमदार प्रताप दादा अडसड यांना या मागणीचे निवेदन देताना उमेश भुजाडणे यांच्यासह प्रवीण गायकवाड ज्ञानेश्वर राजगुरे, मनीष गायकवाड, सुधाकर गायकवाड भारत सिंग चंदेल, भीमराव वानखडे ,जळगाव शंकर नवरंग किशोर डहाट, बापूराव नवरंग हे शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या