चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे :-महिलेचा असह्यपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाने महिलेशी प्रेमसंबंध ठेवले. बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याची घटना साक्री तालुक्यात घडली. तालुक्यातील एका गावात पीडित महिलेचा असह्यपणाचा गैरफायदा उचलून जवळीक साधून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. पीडितेची इच्छा नसतानाही बळजबरीने संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली. आज तिला ११ महिन्यांचा मुलगा देखील आहे. पीडितेला त्रास दिल्याच्या प्रकरणी पोलिसांना आपबितीची फिर्याद केली. शिक्षक किसन भेना राऊत यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
0 टिप्पण्या