चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :-आष्टी- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा येथील वळणावर लोखंडी पत्रे वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होवून उलटला. यात विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाल्याची घटना दिनांक 30 मार्च 2025 रविवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली. रमेश शेरकी (वय 60 वर्ष रा. आष्टी), धीरज श्यामकुमार (वय 27 वर्ष रा. भिलाई), मनोज महंतो (वय 50 वर्ष रा. भिलाई), धनसिंग चौधरी (वय 45 वर्ष रा. भिलाई छत्तीसगड) अशी जखमींची नावे आहेत. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.
0 टिप्पण्या