Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या तिरु नदीपाञात जल नव्हे तर जलपर्णींचे साम्राज्य..!

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:- उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे प्रकल्प असलेल्या तिरु मध्यम प्रकल्पातील शिरुरताजबंद जाणा-या रोडवरुन दिसणा-या तिरु नदीपाञात जल ऐवजी जलपर्णीच जास्त दिसत असल्याने तिरु नदीचे सौंदर्य व पाविञ्य धोक्यात आले आहे.तसेच पुर्वी या नदीचे पाञ पाण्याने खळखळणारे , भव्यदिव्य व रुंद दिसायचे.आता माञ या नदीच्या पाञाचा नाला झाल्याचे बघून नदी व पर्यावरणप्रेमींमधून प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला जातोय.
परवा विधीमंडळात बोलताना राज्यातील नद्यांचे संवर्धन व जतन करणार आहोत.असे पर्यावरन मंञी पंकजा मुंडे म्हणाल्या ख-या पण गत कित्येक वर्षापासून या तिरु नदीची झालेली दुरावस्था ही फक्त न् फक्त  संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या जाणीवपुर्वक दुर्लक्षाने या नदीची बेक्कार हालत झाली आहे.असे म्हणणे चूक ठरणार नाही. कारण,याबाबत अनेकदा पेपरबाजी केली.तरीही याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यापैकी एकानेही लक्ष दिले नाही.म्हणुन आज ही नदी घाण वासाने व बिनकामाच्या झाडांनी ग्रासलेली दिसत आहे.तेंव्हा निर्सग व पर्यावरण यावर बड्याबड्या बाता ठोकणा-या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी महाशय हे याकडे लक्ष घालण्याचे कष्ट घेतील का??

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या