चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-अनेकांच्या दुकाणापुढे तसेच रहदारी साठी अडथळा आणि अपघातास कारण ठरेल,अशा ठिकाणी कोणीही अवैध बॅनरबाजी करु नये,लावु नये . अन्यथा कारवाही केली जाईल.असा सज्जड दम सपोनी.भिमराव एस. गायकवाड यांनी भर रस्त्यात चार—चौघात अवैध बॅनर्स लटकविण्याचा धंदा करणा-या कांही बुरुड लोकांना दिला होता.तसेच अवैध बॅनर्स ऊभा करुन इतर व्यापा-यांना ञास द्याल तर साहित्य जप्त केले जाईल. असा दम ग्रा.पं.मध्ये बोलावुन घेत सरपंच व ग्रा.वि.अधिकारी यांनी दिला होता. तरीही हाळीहंडरगुळीत लटकतातच. याचाच अर्थ असा की,पोलीस आणि ग्राम पंचायतचा आदेश,ईषारा कांही बुरुड मंडळी पायदळी तुडवित आहे. अशी चर्चा सामान्य जनतेत आहे.
दरम्यान पोलीस अधिकारी व ग्रा.पं. यांचे आदेश पायदळी तुडविणा-या व भविष्यात येथील बॅनर्समुळे येथे अपघात व शांतता भंग होण्यास कारण ठरणा-यांवर कारवाहीचा दम दाखविणार कोण?हा प्रश्न चर्चीला जात आहे.
अवैध बॅनर,पोस्ट,होर्डिंग्ज व कमानी बाबत मा. उच्च न्यायालयाने कडक कारवाहीचे आदेश दिले असलेतरीही येथील अनेकांच्या दुकाणासमोर मोठ-मोठे बॅनर लावतात.व या बॅनर मागे असलेले दुकाण चालु आहे का, बंद!हेच समजेना.तसेच विजेचे खांब यावरही बॅनर लावतात.यामुळे विज प्रवाह बॅनर मध्ये उतरुन एखाद्याचा जीव जाऊ शकतो.पण बॅनरसाठी लागणा-या साहित्यांचा धंदा करीत असलेल्या येथील बुरुडांना याचे कांहीच देणे-घेणे नाही.त्यांना फक्त स्वत:चा धंदा चालण्याशी मतलब.
बॅनरवरील रंग निघतो बॅनर नव्हे
बॅनरवर असलेल्या महापुरुषांचा व देवी,देवतांचा रंग निघतो.पण एकदा लावलेले बॅनर दोन 2 महिने जागचे काढत { हालत } नाहीत.यामुळे सार्वजनिक जागेचे विद्रूपिकरण होते व गावाचे सौंदर्य व शांतता धोक्यात येते.तरीही स्वत:ची चुल या धंद्यावर पेटते म्हणुन अन्य कशाचाही विचार बॅनर्स लावायचा धंदा करणारे बुरुड मंडळी करीत नाहीत.
शांतता भंग आणी अपघात व्हावा मगच कारवाही करावी..
असा विचार तर संबंधित करीत नाहीत,ना.असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण,ज्या दुकाणापुढे बॅनर लावत आहात.त्या दुकाणदाराचे नाहरकत तसेच किती दिवस लावणारात.या करीता ग्रा.पं.चे नाहरकत घ्या आणि मगच बॅनर लावा.अन्यथा साहित्य जप्त करु.असा दम कार्यालयात बोलावुन कांही बुरुड मंडळींना ग्रा.पं. ने दिला होता.तसेच अपघात होईल तसेच शांतता व कायदा सु-व्यस्था भंग होईल.अशा प्रकारे कोणीही अवैधरित्या बॅनर लावु नये,अन्यथा कारवाही करणारच!असा दम सपोनी साहेबांनी चार-चौघात व मेनरोडवर दिला होता.तरी यातील एकाच्या ही "दम" चा परिणाम बुरुड मंडळींवर झाला नसल्याचे महिना भरापासून लटकत असलेले आणि वातावरण गढूळ करणारे बॅनर्सकडे बघून म्हटले जाते.तेंव्हा एखादा मोठा अपघात व्हावा तसेच शांतता भंग व्हावी!आणि मगच कारवाही करावी असा विचार संबंधित प्रशासनचा आहे,का?
———————————————
सध्या ग्रा.पं.हद्दीत लटकत असलेले बॅनर्स विनापरवाना लटकत असून याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेणार.असे ग्राम विकासअधिकारी एस.आर. कांबळे म्हणाले
——————————————
ज्या दुकाणापुढे व किती दिवस बॅनर लावायचेत त्या दुकाणदाराचे व ग्रा.पं.चे नाहरकत घ्या.अन्यथा सर्व साहित्य जप्त करण्यात येईल असे कांही दिवसापुर्वी कांही बुरुडांना सांगितलो होतो.आता व्यापारीवर्गांना ञास होईल असे बॅनर्स जप्त करणार,अशी माहिती विजयकुमार अंबेकर यांनी दिली
——————————————
वार्षीक लाखो रुपये भाडे देऊनही आमचे धंदे समोरच्या बॅनर्समुळे कोमात तर अतिक्रमीत जागेवर असलेले बुरुडांचे धंदे जोमात! असा संताप नितीन भोसले व पिंन्टू काळे या व्यापारी बांधवांनी व्यक्त केला
——————————————
बॅनर्स लावणारे "डेअरींग" दाखवुन प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवतात आणि तरीही प्रशासन कारवाहीची हिंम्मत/ डेअरींग का? दाखवत नाही.असा संतप्त सवाल ञस्त व्यापारी व जनतेतून विचारला जात आहे


0 टिप्पण्या