विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड -नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे अवैधरित्या कॅरिबॅग विक्री व वापर होत असल्यामुळे कायदेशीर कार्यवाही करा, या मागणीचे निवेदन महानगरपालिका आयुक्त यांना शिवसेना मा. उपजिल्हा प्रमुख रवी हटकर यांनी दिले आहे.
नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे दूध विक्रेते, किराणा दुकान, बेकरी, जनरल स्टोअर्स, भाजीपाला विक्रेते, मटण विक्रेते, कपडे विक्रेते, ज्यूस सेंटर, हॉटेल इ. ठिकाणी अवैधरित्या कॅरिबॅग विक्री व वापर होत आहे. या कॅरिबॅग ह्या कमी मायक्रोनच्या असल्यामुळे त्याचा वापर झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर फेकून देतात व त्यानंतर मुके प्राणी त्या कॅरिबॅग अनवधानाने खातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नाल्याही तुंबत आहेत.
त्यामुळे कॅरिबॅग विक्री व वापरकर्त्यांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदन महानगरपालिका आयुक्त यांना रवी हटकर यांनी दिला आहे. या निवेदनाद्वारे प्रती जिल्हाधिकारी, पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत


0 टिप्पण्या