Ticker

6/recent/ticker-posts

खाकी च्या धरपकड मोहिमेची वाढवणा व हाळी-हंडरगुळीत चर्चा व दहशत...!!


चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-आयजी शहाजी उमाप,एसपी.सोमय मुंडे,एलसीबीचे.संजिवन मिरकले या वरीष्ठ पोलीस अधिका-यांचे आदेश व सतत रेड टाकत फिरणारे पथकं यांची धास्ती घेतलेले 2 नंबर धंदेवाले कधीतरी व कुठेतरी 2 नंबरचे धंदे करायचे.पण गत कांही दिवसापासुन   वाढवणा ठाणे व हंडरगुळी बीट मध्ये कार्यरत असलेल्या पोलीसअधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या हद्दीत पथकाने रेड करण्यापुर्वी स्वत:च रेड करण्याचा सपाटा लावल्याचे चिञ दिसत असून रोज कोणत्यान्कोणत्या 2 नंबर धंद्यावर स्थानिक खाकीवर्दी मधील लोकं रेड करत असल्याचे बघून 2 नंबरचा काळाधंदा करणारे अनेकजण *अंडरग्राउॅंड* झाल्याचे दिसते.
आता गरीबांच्या घरी सुख व शांती नांदेल व लेकरांना 2 घास सुखाचे खाता येईल.अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत आहे.तर धरकीपकड अन् कारवाही कर!ही मोहिम सुरु केल्याने 2 नंबरचे काळेधंदे करणा-या कांहीलोकांमध्ये खाकीवर्दीची भीती, दहशत पसरली आहे.
खाकीवर्दीतही 1 माणुसच असतो. म्हणुन कांहीवेळा माणुसकी म्हणुन पोलीसवाले कांही धंद्याकडे,व्यक्तीं- कडे कानाडोळा करतात.परंतू गत कांही दिवसापासून वरीष्ठांचे आदेश व सतत रेड करीत फिरणारे पथके! यांच्यामुळे वाढवणा ठाणे,हंडरगुळी बीट मधील खाकीवर्दीवाले अलर्ट झाले.व आजवर कानाडोळा करणारे साहेब पोलीसांच्या विश्वासातील असलेला {गुप्त बातमीदार} तिसरा डोळा याच्या मदतीने वाढवणा,हाळी परिसरातील अवैधधंद्यावर कारवाही करण्याची मोहिम सुरु केल्यामुळे या गावातील बहूतांश अवैध 2 नंबर धंदेवाले नको ती कारवाही अन् नको हे धंदे. असे म्हणत अंडरग्राऊॅंड झाल्याचे समजते.सध्या सुरु केलेली धरपकड ही चर्चेचा विषय बनलीय. कारण,काबाडकष्ट करणारा बहूतांश गरीब,मजुरवर्ग हा 2 नंबर धंद्याच्या {दारु,जुगार} आहारी जात आणि स्व कुटूंबियामध्ये भांडण-तंटे करीत असत.यामुळे अशा कुटूंबियांच्या घरी सुख,शांती कमी आणि अशांती जास्तप्रमाणात नांदायची.परंतू गत कांही दिवसापासून खाकीवर्दीतील अधिकारी,कर्मचारी यांनी धरपकड ही मोहिम राबवायला सुरुवात केली असल्याने गरीबांच्या घरी सुख,शांती नांदतेय व त्यांच्या लेकरांना सुखाचे चार घास खायला मिळतेय.अशी चर्चा सामान्य जनतेत आहे.तर धर- पकड ही मोहिम सुरु केल्याने खाकी वर्दीची दहशत अवैधधंदेवाल्यांमध्ये पसरली आहे.
सपोनी.भिमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक.टी.कोरके,हे.काॅ.संजय दळवे,हेकाॅ.शिवप्रताप रंगवाळ,पोकाॅ बालाजी अक्केमोड,गोरख कसबे, दयानंद सोनकांबळे यांचे पथक हाळी,वाढवणा,हंडरगुळी,रुद्रवाडी, मोरतळवाडी,वडगाव,शेळगाव, राचन्नावाडी,चिद्रेवाडी,सुकणी आदी गावात फेरफटका मारताना व रेड करताना दिसत असल्याने खाकी वर्दीच्या कामगिरीची चर्चा व दहशत या भागात आहे.
*कायदा-सुव्यवस्था मोडणा-या अपप्रवत्तींना कायद्याची "सुंदरी" दाखविण्यासाठी आणि वाढोणा ठाण्याच्या हद्दीतील गावे सुखी व समाधानी असावे,यासाठी हद्दीत "धर-पकड" ही मोहिम सुरुच राहणार आहे.तसेच जनतेनी पण आपल्या आसपास असलेल्या गैरधंद्याची व लोकांची माहिती द्यावी,त्यांचे नाव गुप्त ठेऊ. अशी माहिती सपोनी.भिमराव एस. गायकवाड यांनी फोनवरुन दिली.
वरीष्ठांनी जिल्ह्यात सुरु केलेली "धर-पकड" ही मोहिम हाळी — हंडरगुळी व परिसरात सुरुच राहणार असून या भागातील वातावरण "हॅप्पी" ठेवणार आहोत.अशी माहिती हंडरगुळी बीट प्रमुख संजय दळवे यांनी दिली

कायदा मोडणा-यांना कायद्याचा "हाबाडा" देणे गरजेचे आहे.आणि या पुढील काळात कायदा काय व कसा असतो,हे कायदा मोडणा-या अपप्रवत्तींना दाखवुन देणारच..! असे पोहेकाॅ.एर.के. रंगवाळ म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या