चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-गत कांही दिवसापासून वाढवणा ठाणे व हंडरगुळी दुरक्षेञ हद्दीमध्ये मिसुरडंही न फुटलेली हजारो लहान अल्पवयीन मुलं सुसाटपणे गाड्या चालवित असल्याने तसेच बेशिस्तीत पार्किंग करत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून, अल्पवयीन चालक व त्यांना रुबाबात गाडीची चावी देणारे पालक या दोघांवरही कडक कारवाही करण्यात येणार आहे.तत्पुर्वी अशा कारवाही बद्दल हाळी-हंडरगुळी या दोन गावामध्ये पोलीस व्हॅनवरील भोंग्यातुन जनतेस पुर्वकल्पना/सुचना दिली जाईल. अशी माहिती याबाबत *दै.दिव्य मराठी* मध्ये सचिञ बातमी प्रकाशीत करुन लक्ष वेधले असता रमजान ईद निमित्त्य दि.२५ मार्च रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत आयत्या वेळेच्या विषयावर बोलताना सपोनी.भिमराव एस. गायकवाड यांनी दिली.
आजवर अल्पवयीन चालकांवर व त्यांच्या पालकांवर कुणीच कारवाही केली नाही. म्हणुनच त्या पालकांसह अल्पवयीन चालकांना कसलीही भीती नाही. अल्पवयीन चालकांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तसेच राज्यमार्गावर आणि गल्लो - गल्लीतही अल्पवयीनं मुले धुम स्टाईल गाडी चालवत असतात.तेंव्हा आता पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कडक कारवाही करण्याची मोहिम सुरु करावी,असे मत शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित असलेले युवासेना जिल्हा सरचिटणीस रमण माने,जंटू माने,दत्ता माने,जीवन माने,यांनी मांडले.*
फोनवर बोलणारे,हेल्मेट नसलेले, लायसन्स व अन्य कागदं , नंबर प्लेट नसलेले आणि बेशिस्तीत गाड्या थांबवणारे वाहनचालक तसेच मिसुरडंही न फुटलेले अल्पवयीन चालक व त्यांचे पालक या सर्वांवर लवकरच केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार योग्य ती कारवाही करण्यात येणार आहे.अशी माहिती बैठकीत दिली..
हे.काॅ.शिवप्रताप रंगवाळ,हे.काॅ.दत्ताञ्य वाडकर,चालक सुखाभाऊ बोईनवाड हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते..


0 टिप्पण्या