Ticker

6/recent/ticker-posts

आपले सण-- नवे संदर्भ.मालेवार नगरात आगळी वेगळी होळी


चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा-- स्थानिक प्रगती कॅालनी भंडारा येथील मालेवार नगर येथे होळीचे औचित्य साधून विशरष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शालेय वयातली मुलं अर्वाच्च भाषेत बोलतात,शिवराळ भाषेचा वापर करुनच संबोधन सुरु होते, ज्यामुळे समानमन कलुषित होते,आईबहिण,स्त्रीजाती वरुन, प्राण्यांवरुन फळे,भाज्या,शरीरयष्टी,व्यंग कशावरुनही व्यक्तीला संबोधून बोलल्या जाते.अशा चिडवण्यातून खिजवण्यातून त्या व्यक्तीची मानहानी होते,सर्वांसमोर  अपमानित  झालेला व्यक्ती स्वभान विसरुन तेवढ्याच क्रोधाने स्वत:जवळचा शिवीसाठा वापरतो कधीकधी याचे पर्यावसान अगदी टोकाला जाऊन हानामारी व एकमेकांच्या जिविताला हानी पोहचवण्यापर्यंत पण जाते.स्वत: मधला दुराभिमान, विकृती,असहकार्य वृत्ती,व्यसनाधिनता अशा सर्व दुर्गुणांची होळी करुन शालेय मुलांसमोर सणांचे नवे संदर्भ ठेवण्याचा प्रयत्न कॅालनीतल्या नागरिकांनी केला.दोष लिहिलेले कागद होलिकेत दहन करुन माझ्यातल्या दुर्गुणांचा मी त्याग करत आहे अशी  प्रतिज्ञा घेण्यात आली..
माजी शिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांच्या मार्गदर्शनात वरील समाजभान जपण्याचे आवाहन करण्यात आले.कॅालनीतले सर्व आबालवृद्ध नागरिक ,बालके  या  कार्यक्रमास उपस्थित होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॅा.विनय रहांगडाले,संतोष मदनकर,प्राजक्ता मोहनकर,विजय बोरकर,नरेश ठवकर,वंदना ठवकर,नामदेव गायधने,दिपक चोपकर, स्मिता गालफाडे,यांनी प्रयत्न केले.होलिकोत्सवाच्या या कार्यक्रमात अंताक्षरी व सामुहिक नृत्य असे कार्यक्रम घेतले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या