Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक - ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रम सेवानिवृत्त अधिकारी मा.श्री.दिलीप शिरपूरकर, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मा.श्री. अनिल शहारे साहेब, नाशिक विभागाचे सचिव अँड. सुरेन्द्र सोनवणे, श्री.प्रशांत देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाला.

      श्री. विनोद अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.दिलीप शिरपूरकर यांच्या हस्ते ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमचे अध्यक्ष मा.श्री.दिलीप शिरपूरकर साहेबांना तसेच मा.श्री. अनिल शहारे सरांना गुलाब पुष्प देऊन अँड. सुरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच श्री. राहुल शिंपी यांना घरगुती गणेशसोत्सवात नाशिक महानगर पालिके कडून उत्कृष्ट आरास   बक्षीस मिळवल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
      श्री.प्रशांत देशमुख यांनी ग्राहक दिनाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती देवून ग्राहकांचे हक्क, कर्तव्य. बाबत माहिती दिली. खरेदी करतांना काळजी कशी घ्यावी, ग्राहकांची फसवणूक कशी केली जाते. याबाबत माहिती दिली.
       या प्रसंगी मा. श्री. दिलीप शिरपूरकर साहेबांनी ग्राहक पंचायत ला बँकिंग क्षेत्रातील अडचणी सोडण्या बाबत मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले तसेच गृह खरेदी करतांना होणाऱ्या फसवणुकी बाबत तसेच बिल्डर देत असेलेल्या कार्पेट एरिया बाबत त्यांनी आपली भूमिका मांडली.
     नाशिक विभाग सचिव अँड. सुरेन्द्र सोनवणे यांनी गृह खरेदीत ग्राहकांच्या उदासीनतेमुळे अजूनही आवश्यक तेवढी जागृती झाली नसल्याने फसवणुकीचे प्रकार सुरू असून त्यामध्ये वाढ होत आहे. यातील धोके कमी होण्यासाठी नागरिकांना सजग बनवणे आवश्यक आहे. फसव्या जाहिरातींना बळी न पडता एक जागरूक ग्राहक बनून कशी खरेदी करावी व फसवणूक झाल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.
      श्री. अनिल शहारे  व श्री. राहुल शिंपी यांनी बदलत्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आवाहन करून वेगवेगळ्या माध्यमांचा वापर कसा करावा या बाबत प्रात्यक्षित करून दाखवले.श्री. राजेंद्र नानकर यांनी माहिती अधिकार कायदा बाबत मार्गदर्शन केले.  श्री. हरीश वाघ यांनी शैक्षणीक क्षेत्राबाबत विध्यार्थी व पालकांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित साधकांनी आपला परिचय करून सामाजिक कामाचा परिचय करून दिला.
    सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. विनोद अहिरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. प्रशांत देशमुख यांनी केले.
       या कार्यक्रमास नाशिक विभागाचे सचिव अँड. सुरेन्द्र सोनवणे, श्री.प्रशांत देशमुख, श्री. मोहनसिंग परदेशी, श्री. अनिल शहारे, श्री. राहुल शिंपी श्री. राजेंद्र नानकर, श्री. रवी जाधव, श्री. सुमित शर्मा, श्री. अजिंक्य घोरपडे, श्री. हरीश वाघ, श्री. विनोद अहिरे, श्री. महेश परदेशी, श्री. योगेश आदमाने, श्री. भोसले,  व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या