Ticker

6/recent/ticker-posts

शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी

हल्लाबोल व निदर्शने करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री नितीश कुमार ,राज्यपाल बिहार यांना निवेदन सादर 


चित्रा न्युज प्रतिनिधी
 भंडारा :-बोधगया येथे महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात सोपविण्यात यावा याकरिता 12 फरवरी 2025 पासून आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आज दिनांक 16 मार्च 2025 ला शांतीवन बुद्ध विहार येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.बोधगया महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात सोपविण्यात यावा, 1949 कायदा रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणी  
  करिता पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे भव्य निदर्शने करण्यात करण्यात आले .बिहार सरकार मुर्दाबाद ,नितीश कुमार मुर्दाबाद ,विहार आमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, तथागत गौतम बुद्धांचा  विजय असो, बाबासाहेब डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सम्राट अशोक यांचा विजय असो,अशाप्रकारे नारेबाजी करण्यात आली. या निदर्शनात  भदंत शीलभद्र ,भदंत नागसेन महादेव,  भदंत विनय बोधी महाथेरो ,विनय ढोके (बौद्ध) यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर  भिक्षूसंघ व शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधि बौद्ध , सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे (बौद्ध) यांच्या नेतृत्वात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महामहीम राष्ट्रपती भारत सरकार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे राज्यपाल यांना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद बावणे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता एक भिक्षुनी पट्टाचार्य, भदंत सघानंद, श्रामनेर बुद्धपाल, प्रशांत कुमार बोदेले, जयश्री रोडगे, लता भांबोरे, जनार्दन सुखदेवे, रूपचंद उके, श्रीराम घोडके, रामदास घोडके, कुंदा वाहने, अशोक वाहने, अंजली मोटघरे,मालती मेश्राम, जयमाला उके, वंदना खापरडे स्नेहा साखरवाडे, धम्मचारी विमलरत्न, धम्मचारी अमरत्न नागपूर, धम्मचारीननी अमिता वजरी वर्धा, तारिका घोडके, ज्ञानेश्वर चव्हाण, अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक,झिबलजी कावळे, ज्योती जांभुळकर, व मोठ्या संख्येने बौद्ध उपासक ,उपासिका उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सदर आंदोलन 10 ते 12 वाजेपर्यंत चालले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या