चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा :-दि. 11/3/2025रोजी शेगाव विश्राम भवन येथे शेगाव लहुजी नगर तालुका क्रीडा प्रकल्प ग्रस्त नागरिक ह्यांची बैठक घेऊन त्यांच्या पाठीमागे मातंग समाज समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे उभे राहिले असून त्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना घरकुले मिळावे झालेली कारवाई चुकीची असून हा गोरगरीब प्रकल्प ग्रस्त नागरिक विशेषता मातंग व मुस्लिम दलित बहुजनांनवर शासनाने केलेला अन्याय असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत दि 17/3/2025पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यांच्या सोबत नागेश पाटेकर विदर्भ संपर्क प्रमुख मातंग समाज समन्वय समिती तथा राजेश अवचार अकोला जिल्हाध्यक्ष, जि. ओ. तायडे, संजय जाधव, गोपाल मात्रे रेखा निखाडे विक्रम भाई व बहुसंख्य प्रकल्प ग्रस्त नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या