चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-रविवार दिनांक 9/03/2025 रोजी मॉडेल हायस्कूल माळीनगर येथे मैदानावरती
रोटरी क्लब अकलूज यांच्या विद्यमाने
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या
महिलांच्या भव्य राज्यस्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना शिवरत्न क्रिकेट अकॅडमी विरुद्ध शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांच्या दरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना शिवरत्न क्रिकेट अकॅडमी अकलूज ने 6 षटकात 2 बाद 125 धावा बनविल्या शिवरत्न क्रिकेट अकॅडमी संघाकडून वैष्णवी मिसाळ हिने 75 धावा ची खेळी केली
प्रतिउत्तरात शंकरराव मोहिते महाविद्यालय हा संघ केवळ 48 धावा बनवू शकला हा सामना शिवरत्न क्रिकेट अकॅडमी अकलूज संघाने 77 धावांनी जिंकत विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये
वैष्णवी मिसाळ हिला सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार देण्यात आला
स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल अक्षता सावंत व अंतरा देवकर या दोघींनाही गौरवण्यात आले


0 टिप्पण्या