Ticker

6/recent/ticker-posts

19 वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गावर राज-उद्धव:राज ठाकरे म्हणाले- मतभेद छोटे, महाराष्ट्र मोठा, उद्धव म्हणाले- माझ्याकडून संघर्ष नाही

चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई- महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर दिसू लागले आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी याबाबतचे संकेत दिले. राज ठाकरे म्हणाले- आपल्यात राजकीय मतभेद आहेत, वाद आहेत, मारामारी आहेत, पण महाराष्ट्रासमोर या सर्व खूप लहान गोष्टी आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही फार मोठी अडचण नाही.आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न

राज ठाकरेंनी नुकत्याच महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये युतीसाठी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला.राज ठाकरे म्हणाले, मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही. आमच्यातील भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे.विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला. मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.

भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध अंबादास दानवे

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी तयार असल्याच्या जरी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राज ठाकरे भाजपचा विरोध करणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. तर, अंबादास दानवे यांनी म्हटले की, असा प्रसारमाध्यमांमध्ये प्रस्ताव देऊन काही होत नसते. खरच मनात इच्छा असेल तर इतर मार्ग असतात. महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर स्वागत केले पाहिजे पण भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध केला पाहिजे.

…राज ठाकरेंसोबत जाण्यास उद्धव ठाकरे तयार.. म्हणाले, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते
राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्टच सांगितले.
मी सोबत यायला तयार, पण माझी एक अट आहे. माझ्याकडून सर्व भांडणं मिटली. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, हे आधी ठरवा, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्याकडून भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे. पण त्याआधी भाजपसोब हित की माझ्यासोबत हे आधी ठरवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव यांनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा, असे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर अट घातली आहे. माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली. एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हित आहे की भाजपसोबत हित आहे, हे आधी ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे. पण माझी एक अट आहे. लोकसभेला सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते.

राज ठाकरे यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर तसे स्पष्ट संकेत दिले. महेश मांजरेकर यांनी राज यांना उद्धव यांच्याशी युती करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या ध्येयासमोर आमच्यातील भांडणे लहान आहेत. यावर उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी सांगितले की माझ्याकडून कधीही भांडण झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या