शनिवार दिनांक 26 एप्रिल ला सर्व कार्यकारी महिलांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार गावोगावी व्हावा
आणि महिलांचे रक्षणासाठी समता सैनिक दलात शपथ घेऊन प्रवेश केला
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी दिलेल्या हक्क आणि सन्मान समानतेचा पुरुषाप्रमाणे अधिकार आणि समान जीवन यांची गावागावात जनजागृती व्हावी, याप्रसंगी प्रमुख पाहुणे पृथ्वी मोटघरे सचिव नागपूर विभाग यांनी समता सैनिक दलाची स्थापना 1927 ला झाली ती का आणि कशी झाली याबद्दलची योग्य अशी माहिती देवुन उदाहरणासहित स्पष्टीकरण करून दिला सांगीतले आणि नंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले,तसेच प्रमोद जी खांडेकर विजय जी उके, सारिका धारगावे प्रतिमा खांडेकर, या मंचावर उपस्थित होत्या,
वक्त्याच्या भाषणानंतर शितलवाडी शाखाप्रमुखांची निवड करण्यात आली
शाखाप्रमुख वैशाली वाघमारे यांची त्यांच्या स्वइच्छेने व सर्वांच्या साक्षीने निवड झाली ज्योती धारगावे उप ट्रेनिंगकमांडर म्हणून तर स्वाती रवींद्र लोणारे यांची ट्रेनिंग कमांडर म्हणून निवड करण्यात आली याप्रसंगी अनिसच्या सचिव शुभा थुलकर यांनि समता सैनिक दलावर आधारित हम भीम शिपाई है! हे गीत सादर केले,
जयघोषात सारा परिसर गदगद
फुलून गेला जणू काही झाड वेली
डोलू लागली ,याप्रसंगी
अंजली गेडाम, स्मिता जीबे ,प्राजक्ता हुमणे ,माधुरी नंदेश्वर, कांचन गायकवाड, शीला साहारे ,मनोरमा राऊत ,तारा मेश्राम, राखी गजभिये आम्रपाली सांगोडे, या सर्व महिलांनी समता सैनिक दलात पदार्पण केले
या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून
परिसरातील जेष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता करून आभार वैशाली वाघमारे ,यांनी केले धन्यवाद जय भिम जय भारत


0 टिप्पण्या