जागतिक आरोग्य दीना निमित्त महानगरपालिका रुग्णालयात मोफत बाह्य रुग्ण विभागाचे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड :- जागतिक आरोग्य दीनाचे औचित्य साधून गरजू रुग्णांना मोफत औषधं उपचार मिळावा या उद्दात भावनेतून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या शिवाजीनगर व हैदरबाग मनपा दवाखान्यात बाह्य रुग्ण विभाग मोफत योजनेचे उदघाटन *मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिका आयुकांनी 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना काही घोषणा व्यक्त केल्या होत्या, त्याचीच वचनपूर्ती म्हणून महापालिकेतील या दोन रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग अर्थात ओपीडी मोफत करण्याच्या योजनेस सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी *आरोग्य विभागाच्या उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन,* मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया पंडित, डॉ. विनोद चव्हाण,डॉ. प्रांजली जोशी, डॉ. विजया राठोड, डॉ. सचिन चांडोळकर,डॉ. रितेश बिसेन,डॉ. संध्याराणी देसाई, समूपदेशक माधव सुगांवकर, गिरीष कामिणवर,भास्कर जोंधळे,राजकुमार पांचाळ,माधव आलापुरे, जमुना वाघमारे, शामला पाटील,राघोमोड सिस्टर राजकुमार तेलंगे,दीपकराव पाईकराव, मनोज बुंदले,विजय इंगोले सर्व स्टाफ नर्स सह कस्तुरबा मातृ सेवा केंद्र शिवाजीनगर मनपा रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी शहरातील कस्तुरबा मातृ सेवा केंद्र शिवाजीनगर मनपा रुग्णालयात व हैदर बाग मनपा रुग्णालयात ही OPD बाह्य रुग्ण सेवा मोफत असेल असे जाहीर करून शहरातील सर्व गरजू व शहरालगतच्या गावातील रुग्णांनी या सुविधेचा उपयोग घ्यावा असे अहवान मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व उपाआयुक्त स.अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे.
0 टिप्पण्या