हिंगोली कदम. जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड:-हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेला या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येते की हिमायतनगर तालुक्यातील दिनांक ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकी द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित सोडत करण्याकरिता दिनांक २५. मार्च २०२५ रोजी निश्चित करण्यात आलेली असल्याने सदर आरक्षण सोडत हे दिनांक २५. ४. २०२५. रोजी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे हदगाव तथा नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत मुदत
संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत हिमायतनगर तहसील कार्यालय येथे दुपारी ठीक ३ वाजता करण्यात येणार असल्याचे हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांनी संबंधित नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती हिमायतनगरचे मंडळ अधिकारी बी एम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पळसपुर सज्याचे तलाठी सचिन जावरकर व टेंभी सज्जाचे तलाठी संजय बिराडे यांनी सांगितले या वेळी संतोष रासमवाड , संजय शामलवाड , योगेश आलेवाड कोतवाल उपस्थित होत.


0 टिप्पण्या