चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-महिला पतंजली योग समिती (सिविल लाईन), भंडारा च्या वतीने २३ एप्रिल ला ४ दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे शुभारंभ सिविल लाईन गार्डन भंडारा येथे पार पडले.योग शिक्षिका वैशालीताई गिरीपुंजे,सह शिक्षिका सौ रजनी बालपांडे यांनी सकाळी ५.३० वाजे पासून महिला योग साधकांकडून या प्रथम योगसत्रात लठ्ठ पणा,मानसिक शांती साठी सूर्य नमस्कार ,प्राणायाम ई चे धडे गिरविले. सकाळी ६.३० वा.आयोजित शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मानसिक रोग
तज्ञ डॉ.रत्नाकर बांडेबुचे, दंत रोग तज्ञ डॉ.अजय बत्रा,ग्रीन हेरिटेज चे सईद शेख,पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके ई मान्यवर पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथम पाहुणे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले,पश्चात वृक्ष रोपटे देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित योग साधंकांना योग्य ते मार्गदर्शन केले.सूत्र संचालन सौ मंजुषा डवले,स्वाती कटरे ई नी केले. हे शिबिर २६ एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून या शिबिराचा लाभ जास्तीस जास्त संख्येने घेण्याचे आहवान समिती कडून करण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या