........................................
रामावत परिवाराची सतत वीस वर्षा पासुन सुरु आहे अविरत सेवा
........................................
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-तळेगाव दशासर येथील रामावत परिवार यांचे कडून सतत 20 वर्षा पासुन बस स्टॅन्ड येथे उन्हाळात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने पाणपोई सुरु करण्यात आली सतत वीस वर्षापासुन ही सेवा अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. बस स्टॅन्ड वरून जाणाऱ्या येणाऱ्या बस , तसेच इतर वाहनामध्ये प्रत्येक प्रवाश्याना पिण्या करिता थंड पाणी प्रवाश्याच्या बसलेल्या जागेवर पोहचविण्याचे कार्य पाणपोई द्वारे रामावत परिवार करीत आहे. 20 एप्रिल रविवार रोजी बस स्टॅन्ड येथे स्व.ठाकूरदासजी रामावत स्मृती प्रित्यर्थ रामावत परिवार यांचे कडून पाणपोई चे उदघाट्न करण्यात आले यावेळी तळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामेश्वर धोंडगे, नरेंद्र रामावत, जयकुमार रामवत, भागचंद रामावत,गोविद कामडी, विजय गुल्हाने, भारती चुटे, रवी चुटे, श्याम घाटे, राजेंद्र भिवरकर, आनंद देशमुख, सुयश देशमुख,, डॉ. विनोद देशमुख,ओमप्रकाश शर्मा, रमेश ठवकर, ओमप्रकाश गोहत्रे,विशाल श्रीवास, , व पत्रकार बंधू इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या