चित्रा न्युज प्रतिनिधी
रायगड : वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा(उ) अंतर्गत खोपोली शहराच्यावतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहीम डॉ.बाबासाहेब स्मारकाच्या इथे राबविण्यात आली.
जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष सुमित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्वाक्षरी मोहीम पार पडली. यावेळी संतोष मर्चंडे, अखिल शेख, ज्योतीताई खाडे, रोहित वाघमारे, कुणाल पवार, प्रफुल कदम, मितालीताई वाघमारे, गणेश वाघमारे यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी शहरातील सर्व शाखेतील पदाधिकारी आणि सदस्य तसेच इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील स्वाक्षरी मोहिमेत सक्रिय सहभाग दर्शवीत सदर आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे संदीपजी गाडे, पंकज गायकवाड यांच्यासह शहरातील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या