स्थानिक पुढा-यांची गुंडगिरी खपवून घेणार नाहीत,जशास तसे उत्तर देऊ- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
धडगांव : भ्रष्टाचाराचाविरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरिता १५ एप्रिल २०२५ ला होणा-या बिरसा फायटर्सच्या ठिय्या आंदोलनला रोखण्यासाठी धडगांव तालुक्यातील मोडलगांव ग्रामपंचायतीचे सरपंच राज्या बाज्या पटले यांनी आंदोलन कर्ते दिलवर पाडवी यांना ३ गुंड लावून मारायला लावले. आंदोलन होण्याच्या आधीच सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान संशयीत आरोपी मनोज सह २ गांव गुंड दिलवर पाडवी यांना बाबा चौक येथील दुकानावर जाऊन,तु मोडलगांवच्या सरपंचाविरोधात आंदोलन करू नको,भ्रष्टाचाराबाबत तक्रार मागे घे,सरपंच राज्या बाज्या पटले यांच्या वाट्याला जाऊ नको,त्यांनी आम्हाला तुला मारायला पाठवले आहे,तू सरपंचाचे व आमचे काहीही ऊपाळून घेणार नाही,पोलीस सुद्धा आमचे काय उफाळून घेणार नाहीत, जर तू आंदोलन केले तर तुझे मर्डर करून टाकू,अशी जीवे ठार मारण्याची धमकी देत गालावर चापट मारून लाथ्था बुक्क्यांनी मारहाण करत इमारतीच्या तिस-या मजल्यावरून आंदोलन कर्त्याला उचलून खाली फेकण्याचा प्रयत्न संशयीत आरोपी मनोज सह २ गांव गुंडांनी केला.
याबाबत धडगांव पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलवर पाडवी रा.मोडलगांव ता.धडगाव यांनी मोडलगांवचे सरपंच राज्या लाज्या पटले,मुलगा भगतसिंग राज्या पटले सह मनोज सोबत २ संशयीत अशा एकूण ५ जणांविरुद्ध धडगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.संशयीत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२),३५१(२),३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची चौकशी पोलीस काॅस्टेबल १०४७ गिरासे करीत आहेत.
स्थानिक पुढा-यांची ही गुंडगिरी व दादागिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत, त्यांना जशास तसे उत्तर देऊ, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत,पाणी,वीज, रस्ता,शाळा,अंगणवाडी ,दवाखाना अशा मूलभूत हक्कांसाठी आंदोलन करीत आहोत.स्वातंत्र्याची ७८ वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही म्हणून जीवघेणा प्रवास करत द-या खो-यातून माता भगिनींना भटकावे लागते,वीज नाही म्हणून अंधारात राहावे लागते, रस्ता नाही,शाळा नाही,अंगणवाडी नाही अशा मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम जिल्ह्य़ातील स्थानिक पुढा-यांनी केले आहे.या समस्यांना सर्वस्वी जबाबदार जिल्ह्य़ातील स्थानिक पुढारी,आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीच आहेत. आमचे आंदोलन दडपण्याचा,आमचा आवाज दाबण्याचा कुणीही करू नये,आम्ही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत निवेदन देत राहू,आंदोलन करत राहू,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.आंदोलनात हजारो महिला व पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या