सहा जणांची टोळी उघडकीस, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
बार्शी शहर पोलिसांची मोठी कारवाई; दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर – बार्शी शहरात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ विक्री प्रकरणात शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी तिघांना अटक केली आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या तिघांसह आता एकूण सहा जणांची टोळी समोर आली असून, पोलिसांनी १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेले नवीन तीन आरोपी :
वसीम इसाक बेग (वय ३६, रा. परांडा)
जावेद नवाबमुद्दीन मुजावर (वय ३६, रा. परांडा)
जमीर अन्सार पटेल (वय २८, रा. गाडेगाव रोड, बार्शी)
या तिघांना पोलिसांनी अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या विरोधातील पुरावे ग्राह्य धरून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पूर्वी अटक झालेले आरोपी :
असद हसन देहलूज (वय ३७, रा. परांडा)
मेहफूज महंमद शेख (वय १९, रा. बावची, ता. परांडा)
सर्फराज अस्लम शेख (वय ३२, रा. काझी गल्ली, बार्शी)
दि. १७ एप्रिल रोजी बार्शी-परांडा रोडवरील एका हॉटेलजवळ सापळा रचून पोलिसांनी पहिल्या तिघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता :
२०.४ ग्रॅम अमली पदार्थ (९ प्लास्टिक पाकिटांत)
एक चारचाकी कार
गावठी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे
रोख रक्कम ८,००० रुपये
तीन मोबाईल फोन्स
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – सुमारे १३ लाख रुपये
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांनी या टोळीविरुद्ध सखोल तपास सुरू केला आहे. अटक आरोपी एकमेकांशी संबंधित असून एकाच ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून आरोपींच्या मोबाईलमधील माहिती, कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आदींची तपासणी सुरू आहे.
तपास अधिकारी : पोलीस उपनिरीक्षक अभय माकने
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता असून पोलिसांनी या टोळीचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
0 टिप्पण्या